Join us
Daily Top 2Weekly Top 5

आणखी १ हजार मेगावॉटमुळे आता मुंबईत ‘बत्ती’गुल नाही, कुडूस ते आरे अदानीची नवी वीजवाहिनी अखेर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 09:31 IST

Electricity: कुडूस ते आरे ही १ हजार मेगावॉट क्षमतेची वीज वाहिनी अदानी एनर्जी सोल्यूशन्सने सुरू केली असून, मुंबईत सोलार ऊर्जेचा पुरवठा मोठ्या प्रमाणात शक्य झाला आहे.

मुंबई -  कुडूस ते आरे ही १ हजार मेगावॉट क्षमतेची वीज वाहिनी अदानी एनर्जी सोल्यूशन्सने सुरू केली असून, मुंबईत सोलार ऊर्जेचा पुरवठा मोठ्या प्रमाणात शक्य झाला आहे. या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशात वीज पारेषण वाहिन्यांची सुरक्षा वाढणार असून, वीजनिर्मितीवरील अवलंबित्व कमी होईल. तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका कमी होईल व  खंडित झालाच तर या नव्या वीज वाहिनीतून १ हजार मेगावॉट वीज मिळाल्याने मुंबईत अंधारात जाणार नाही.

ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या मुंबईतील वीज खंडित घटनेनंतर, वीजपुरवठा व्यवस्थेतील उणिवा स्पष्ट झाल्या. त्यानंतर या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली.  अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने कुडूस ते आरे यादरम्यानचा  १ हजार मेगावॉट क्षमतेचा उच्च-दाब वीज प्रवाह सुरू केला. प्रकल्पात ३० किमी लांबीची ओव्हरहेड लाइन आणि ५० किमी लांबीचा भूमिगत वीज मार्ग समाविष्ट आहे. 

सोलर ऊर्जाही मिळणारमुंबई व एमएमआरला या माध्यमातून शहराबाहेरील स्त्रोतांमधून, विशेषतः इतर भागात निर्माण होणारी सोलर ऊर्जा अधिक प्रमाणात घेणे शक्य होणार आहे. मुंबई आधीच राष्ट्रीय वीज ग्रीडशी जोडलेली असली तरी, ही वाहिनी उच्च क्षमतेने वीज प्रवाह सुनिश्चित करेल.१ हजार मेगावॉट क्षमतेमुळे शहरातील वीजनिर्मितीवरील अवलंबित्व कमी होईल.  वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका कमी होईल. प्रकल्पात व्होल्टेज सोर्स कन्व्हर्टर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तंत्रज्ञानामुळे वीज प्रवाहावर अधिक वेगवान व अचूक नियंत्रण शक्य होते. व्होल्टेज स्थिरता सुधारते. जागेच्या मर्यादा असलेल्या शहरी भागात ग्रीडची विश्वासार्हता वाढते, असे अदानी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कंदरप पटेल यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai avoids blackout: New power line from Kudus to Aarey operational.

Web Summary : Adani's Kudus-Aarey power line ensures Mumbai gets 1000 MW, preventing blackouts. Solar energy supply increases, reducing reliance on local generation. The project enhances grid reliability and voltage stability using advanced technology.
टॅग्स :वीजअदानीमुंबई