भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 06:52 IST2024-05-01T06:51:23+5:302024-05-01T06:52:10+5:30

महापालिकेच्या भांडूप येथील प्रसूती गृहात दुर्घटना

electricity went out during delivery, convulsions by torchlight; Death of mother with baby | भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू

भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू

मुंबई : उत्तर पूर्व मुंबईत निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच भांडुपच्या सुषमा स्वराज पालिका प्रसूती गृहात प्रसूती दरम्यान विद्युत प्रवाह अचानक खंडित झाल्याने डॉक्टरांना टॉर्चच्या प्रकाशात गर्भवती महिलांची प्रसूती करण्याची वेळ आली. एका गर्भवती महिलेच्या सिझरिंग दरम्यान नवजात शिशूचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ आईचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

भांडुप हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबीयांसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सैदूननिसार अन्सारी या महिलेचे दीर शाहरूख अन्सारी यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी वहिनीला तपासणीसाठी रुग्णालयात नेले, त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्यांना त्रास वाढल्याने सायंकाळी डॉक्टरांनी दाखल करून घेतले. रात्री ९ च्या सुमारास त्यांना अचानक ब्लिडिंग सुरू झाल्याने डॉक्टरांनी बाळाचे हार्ट रेट कमी होत असल्याचे सांगून सिझरिंगसाठी घेतले. त्याच वेळेस अचानक वीज गेली. त्यात बाळाचा मृत्यू झाला.

डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या कारवाईकडे दुर्लक्ष...

बाळ रडते म्हणून यापूर्वीदेखील तोंडाला चिकटपट्टी लावणे तसेच ऑपरेशन दरम्यान कापूस महिलेच्या पोटातच ठेवल्याचा धक्कादायक
प्रकार घडला होता. मात्र, त्यानंतर संबंधित डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर कुठलीही
कारवाई झालेली नाही. पोलिसांसह संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे.
- जागृती पाटील, स्थानिक माजी नगरसेविका

■ वहिनीची तब्येत बिघडल्याने तिला सायन
रुग्णालयात नेण्यास सांगितले.
■ तेथे दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.

■ डॉक्टरांच्या चुकीमुळे बाळ आणि आईचा मृत्यू झाला असून, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी शाहरूख अन्सारी यांनी केली आहे.

चौकशीसाठी समितीची स्थापना

महिला नेहमीप्रमाणे सोमवारी दुपारी तपासणीसाठी आली. बाळ आणि त्या दोघेही नॉर्मल होते. सायंकाळच्या सुमारास त्यांना ब्लिडिंग सुरु झाले. बाळाचे हार्ट रेटही कमी जाणवत असल्याने कुटुंबीयांना सिझरिंगबाबत कल्पना दिली.

मात्र, नातेवाइकांनी नॉर्मल डिलिव्हरीचा आग्रह धरत नकार दिला. त्यानंतर, बाळाचे वजन आधीच जास्त होते, त्यात हार्ट रेट जास्त कमी झाल्याने कुटुंबीयांना तत्काळ सिझरिंग करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगून सिझरिंगला घेतले.

सिझरिंग दरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याचे समजले. बाळाला बाहेर काढले. त्यानंतर गर्भपिशवी शिवत असताना अचानक वीज गेली. दुपारीच दुरुस्त केलेला जनरेटरही चालू झाला नाही. त्यामुळे बॅटरीच्या मदतीने पुढील प्रक्रिया पूर्ण केली.
ऑपरेशन दरम्यान महिलेला दोन वेळा आकडी आली होती. त्यांची प्रकृती खालावल्याने तत्काळ सायन रुग्णालयात हलवले, तेथे प्रवासात त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या आरोपानंतर चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. त्यानुसार, चौकशी सुरू आहे.

- डॉ. चंद्रकला कदम, वैद्यकीय अधिष्ठाता

Web Title: electricity went out during delivery, convulsions by torchlight; Death of mother with baby