वीज ठेकेदार ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत

By Admin | Published: February 20, 2015 01:27 AM2015-02-20T01:27:07+5:302015-02-20T01:27:07+5:30

राज्यातील पाच हजारांहून अधिक ठेकेदारांना नोंदणी आणि नूतनीकरण शुल्क कमी होण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

Electricity contractor waiting for 'good days' | वीज ठेकेदार ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत

वीज ठेकेदार ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत

googlenewsNext

नारायण जाधव - ठाणे
लोकशाही आघाडी सरकार जाऊन अच्छे दिन आएंगे असे स्वप्न दाखविणारे भाजपा सरकार आले तरी विद्युत ठेकेदारांवरील अन्याय संपण्याची चिन्हे दिसत नाहीत़ प्रशासनातील अधिकारी मात्र तेच असल्याने राज्यातील पाच हजारांहून अधिक ठेकेदारांना नोंदणी आणि नूतनीकरण शुल्क कमी होण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नोंदणी आणि नूतनीकरण शुल्क वसूल केले जाते. हे शुल्क वीज ठेकेदारांना स्थापत्य ठेकेदारांपेक्षा जवळपास दुप्पट ते तिप्पट अधिक भरावे लागते. ते कमी करावे, अशी मागणी महाराष्ट्र इलेक्ट्रिकल इंजिनीअर्स असोसिएशनने गेल्या वर्षापासून लावून धरली आहे़ याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने आवाज उठविल्यानंतर ८ आॅगस्ट २०१४ रोजी झालेल्या बैठकीत तत्कालीन सचिव श्यामलकुमार मुखर्जी यांनी हे शुल्क कमी करण्याचे आश्वासन दिले. तसा प्रस्तावही तयार केला होता़ मात्र, राज्यातील सरकारमध्ये बदल झाला़ सार्वजनिक खात्याचे मंत्री व सचिवही बदलले़ विभागाला प्रथमच आयएएस सचिव मिळाला़ मात्र, तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्या इशाऱ्यानुसार वागणाऱ्या आठवले, सरदेशमुख, गाडगे, नाईक यांच्यासारख्या काही मूठभर अधिकाऱ्यांच्या अट्टाहासापायी विभागातील दप्तरदिरंगाई कायम असल्याचा आरोप महाराष्ट्र इलेक्ट्रिकल इंजिनीअर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश ढोकळे-पाटील यांनी केला आहे़ यामुळेच राज्यभरातील पाच हजारांवर ठेकेदार ज्या प्रस्तावाच्या प्रतीक्षेत आहेत, त्या नोंदणी आणि नूतनीकरण शुल्काच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव आनंद कुलकर्णी यांच्या कार्यकालातही लालफितीत अडकला असल्याचे ते म्हणाले़ यामुळे वित्त विभागाच्या थातूरमातूर शंकांचे निरसन न करता या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव गुंडाळून ठेवल्याचे सांगून याबाबत न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे़

‘सार्वजनिक बांधकाममंत्री बदलले तरी खात्यातील तत्कालीन मंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचणारे अधिकारी मात्र तेच आहेत़ मुख्यमंत्र्यांनी १३ अभियंत्यांना निलंबित केले असले तरी या विभागाच्या बाबंूवरही झाडू फिरवला तर आमच्यावर लादलेले दुप्पट ते तिप्पट नोंदणी आणि नूतनीकरण शुल्क कमी करण्याच्या प्रस्तावास अंतिम स्वरूप मिळू शकेल,’ असे मत इलेक्ट्रिकल इंजिनीअर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश ढोकळे-पाटील यांनी मांडले.

हा आहे लाल फितीत अडकलेला प्रस्ताव
वर्गकामाची पूर्वीचे प्रस्तावित
क्षमतानोंदणी शुल्कनोंदणी शुल्क
अअमर्याद२५़,०००१०,०००
ब२५ लाख२०,०००७०००
ब-११५ लाख१५,०००५०००
क१० लाख१०,०००३०००
ड७़५ लाख५०००२५००
इ२ लाख ३०००१५००

Web Title: Electricity contractor waiting for 'good days'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.