Join us

वीज बिले न भरलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू होणार - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 07:35 IST

राज्यात दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये राबवायच्या योजनांचा आढावा घेणाºया मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.

विशेष प्रतिनिधीमुंबई : टँकरद्वारे पाणी पुरवठा होणाऱ्या ठिकाणी तात्पुरती पाणी पुरवठा योजना सुरु करुन नागरिकांना पाणी पुरविण्यात येणार आहे. चारा छावण्या सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाºयांना अधिकार देण्यात आले आहेत. वीज बिल न भरल्याने बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना बुधवारपासून सुरू होतील, असे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सांगितले.

राज्यात दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये राबवायच्या योजनांचा आढावा घेणाºया मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यास बबनराव लोणीकर, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, महादेव जानकर हे सदस्य मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जालना, बुलडाणा, अकोला, सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याबाबत मागणी होत आहे. मात्र दुष्काळ जाहीर करण्यासाठी तेथील जिल्हा प्रशासनाने त्याबाबतचा अहवाल दोन दिवसांत सादर करावा, असे निर्देश संबंधित जिल्हाधिकाºयांना देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. तात्पुरत्या पाणी योजनांचे काम पूर्ण होईपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरुच राहील. पाण्याची उपलब्धता आहे, तेथे शेतकºयांना मोफत बियाणे आणि खते देऊन चारा लागवडीसाठी प्रोत्साहित केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.चारा छावण्यांचे अधिकार जिल्हाधिकाºयांना; टँकरमुक्तीसाठी योजनाबंद योजना बुधवारपासून पूर्ववत सुरू होणारपिण्याच्या पाण्याच्या योजना वीजबिल न भरल्यामुळे बंद आहे अशा योजनांसाठी शासनातर्फे पाच टक्के वीज बिल भरुन त्या तातडीने सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी २९ कोटी रुपये अदा करण्यात आले असून बुधवारपासून बंद योजना पूर्ववत होतील. तसेच प्रत्येक जिल्ह्यात गोरक्षण संस्था आहेत. त्यांनादेखील १०० ते १५० जनावरे सांभाळण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. यासाठी या संस्थांना अनुदान देखील देण्यात येणार आहे.

टॅग्स :चंद्रकांत पाटील