वीजबिल थकले; एक लाख ग्राहकांचा पुरवठा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:26 IST2026-03-21T13:26:37+5:302026-03-21T13:26:47+5:30

फेब्रुवारी व मार्च २०२६ या दोन महिन्यांत भांडुप परिमंडळात एक लाख पाच हजार १४४ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

Electricity bills are overdue; supply to one lakh customers disrupted | वीजबिल थकले; एक लाख ग्राहकांचा पुरवठा खंडित

वीजबिल थकले; एक लाख ग्राहकांचा पुरवठा खंडित

मुंबई : २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अखेरीसही वीज देयक न भरलेल्या ग्राहकांविरोधात महावितरणने कारवाईचा बडगा उगारला आहे. फेब्रुवारी व मार्च २०२६ या दोन महिन्यांत भांडुप परिमंडळात एक लाख पाच हजार १४४ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

महावितरण मुख्य कार्यालयाच्या आदेशानुसार सर्व परिमंडळात वीजबिल वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. वारंवार सूचना देऊनही देयक न भरलेल्या ग्राहकांविरोधात ही कारवाई करण्यात येत आहे. फेब्रुवारी ते मार्चदरम्यान थकीत वीजबिल असलेल्या सर्व वर्गवारीतील १,०५,१४४ लघुदाब ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात आली.

मोबाइलवर सूचना देऊनही वीजबिलाचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश सर्व विभागीय व शाखा कार्यालयांना दिले आहेत. ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन केले आहे. चोरून वीज वापरणाऱ्या ग्राहकांविरोधातही कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट आहे.

संजय पाटील, मुख्य अभियंता, भांडुप परिमंडळ, महावितरण

Web Title : बिजली बिल बकाया: भांडुप में एक लाख ग्राहकों की बिजली काटी गई

Web Summary : महावितरण ने फरवरी-मार्च में भांडुप के 1.05 लाख ग्राहकों की बिजली बिल बकाया होने के कारण काट दी। बार-बार सूचना देने के बावजूद भुगतान नहीं करने पर यह कार्रवाई की गई। महावितरण का लक्ष्य 100% वसूली है और बिजली चोरी के खिलाफ चेतावनी दी है।

Web Title : Power Bill Defaulters Face Disconnection: Lakh Customers Affected in Bhandup

Web Summary : Mahavitaran disconnected power supply to 1.05 lakh Bhandup customers in February-March due to unpaid bills. Despite repeated notices, these customers failed to pay, leading to the action. Mahavitaran aims for 100% recovery and warns against electricity theft.

टॅग्स :electricityवीज