Join us
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक पथकाच्या कर्मचाऱ्याला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 15:45 IST

याची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने विलेपार्ले येथील पोलिस ठाण्यात इफ्तिकार अहमद मोहम्मद अहमद या इसमाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही  तक्रार देण्यात आली.

मुंबई : पालिका निवडणुकीसाठी आचारसंहितेचे पालन होते की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी मुंबईत विविध ठिकाणी पालिकेची स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत. विलेपार्ले येथील अशाच एका स्थिर सर्वेक्षण पथकातील पालिका कर्मचाऱ्याकडून गाडीची तपासणी केली जात असताना मारहाणीचा प्रकार समोर आला. याची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने विलेपार्ले येथील पोलिस ठाण्यात इफ्तिकार अहमद मोहम्मद अहमद या इसमाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही  तक्रार देण्यात आली.पालिकेच्या के पूर्व विभागामध्ये कनिष्ठ अवेक्षक पदावर असलेल्या सुरेश जानू राठोड यांची नेमणूक विलेपार्ले हद्दीत मिलन सबवे येथे एस.एस.टी येथील पथकामध्ये नोडल अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. रविवारी २८ डिसेंबर रोजी, दुपारी दीड वाजता राठोड यांच्याकडून पांढऱ्या रंगाच्या मारूती सुझुकी कंपनीच्या स्विफ्ट ओला उबेर गाडीची तपासणी करण्यात आली. तपासणी करताना पाठीमागे बसलेल्या इफ्तिकार अहमद मोहम्मद अहमद या व्यक्तीने व्हिडीओग्राफीचे कारण विचारत त्यासाठी मनाई केली. मात्र सदर व्यक्तीने व्हिडीओग्राफर आणि राठोड यांना शिवीगाळ करत, मारहाण केली व धमकी दिल्याची माहिती राठोड यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Election squad worker assaulted during vehicle inspection in Vile Parle.

Web Summary : A municipal election squad worker was assaulted in Vile Parle while inspecting a vehicle. An FIR has been filed against the accused for obstructing government work after he verbally abused, threatened, and assaulted the worker during the inspection of an Ola Uber car.
टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिकापोलिस