CoronaVirus : घरगुती वादातून मुलानेच केली वृद्ध वडिलांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 05:40 IST2020-04-28T05:32:22+5:302020-04-28T05:40:32+5:30

भांडुपमध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी भांडुप पोलिसांनी मुलाला अटक केली.

An elderly father was killed by his own son in a domestic dispute | CoronaVirus : घरगुती वादातून मुलानेच केली वृद्ध वडिलांची हत्या

CoronaVirus : घरगुती वादातून मुलानेच केली वृद्ध वडिलांची हत्या

मुंबई : घरगुती वाद होतेच. त्यात लॉकडाउनमुळे संपूर्ण दिवस दोघेही घरातच एकमेकांसोबत असल्याने हे वाद वाढले आणि मुलाने वृद्ध वडिलांची हत्या केली. भांडुपमध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी भांडुप पोलिसांनी मुलाला अटक केली. सचिन गोरिवले (३४) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
भांडुप सुभाषनगर नगर येथील म्हाडा कॉलनीत कृष्णा गणपत गोरिवले (७४) हे पत्नी मुलगा आणि मुलीसोबत राहायचे. मुलाच्या नोकरीवरून वडिलांसोबत त्याचे सतत वाद होत असत. त्यात लॉकडाउनमुळे घरातला हा वाद वाढला. याच वादातून शनिवारी रात्री मुलाने वडिलांना काठीने बेदम मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी घरच्यांची उलटतपासणी केली असता मुलाने हत्येची कबुली दिली.

Web Title: An elderly father was killed by his own son in a domestic dispute