मुंबई : ऑनलाइन लुटण्यासाठी सोशल मीडियावर जाहिरातबाजी करणाऱ्या भामट्यांच्या जाळ्यात चुनाभट्टी येथी वृद्ध दाम्पत्य अडकले. जुन्या नाण्यांच्या मोबदल्यात ५० ते ६० लाख रुपये देण्याचे प्रलोभन दाखवून त्यांचे १९ लाख रुपये लुटण्यात आले. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी अज्ञात टोळीवर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार गौरी शंभू (७५) या पतीसोबत चुनाभट्टी येथे राहतात. गौरी यांच्या सासूला भारतीय चलनातील नाणी जमा करण्याचा छंद होता. त्यांनी त्यांच्या हयातीत भारतीय चलनातील जुनी नाणी जमा केली होती. २०१५ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर ही नाणी तक्रारदार यांच्या पतीकडे होती. जुन्या नाण्यांची चांगली किंमत मिळते असे शंभू दाम्पत्याला माहीत होते. मे २०२५ मध्ये गौरी यांना फेसबुकवर ओल्ड कॉईन कंपनीची एक जाहिरात दिसली. गौरी यांनी त्या जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव अनिलकुमार असून तो ओल्ड कॉईन कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले. त्याच्या सांगण्यानुसार, गौरी यांनी त्यांच्या जवळ असलेल्या जुन्या कॉईनचे त्याला व्हॉट्सअॅपवर फोटो पाठविले. फोटो बघून त्याने कॉईनचे ५० ते ६० लाख रुपये मिळतील, असे सांगून गौरी यांचा विश्वास संपादन केला. पुढे, त्याने कॉईनची खरी किंमत काढणे, व्हॅल्यूएशन करण्यासह वेगवेगळी कारणे देत जानेवारी २०२६ पर्यंत गौरी यांच्याकडून १९ लाख रुपये उकळले.
अटकेची भीती
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अनिलकुमार याने व्हॉट्सअॅपद्वारे कॉल करून आणखीन पैसे न दिल्यास आयकर अधिकाऱ्यांना सांगून ते अधिकारी घरी येऊन अटक करतील अशी धमकी देऊन आणखी रक्कम उकळल्याचा आरोप गौरी यांनी तक्रारीत केला आहे.
Web Summary : Mumbai couple lost ₹19 lakh after falling prey to online scammers promising ₹50-60 lakh for old coins. The fraudsters gained trust, extorting money under various pretexts, and even threatened arrest by income tax officials if more funds weren't provided. Police have registered a case.
Web Summary : मुंबई में एक दंपति को पुराने सिक्कों के लिए ₹50-60 लाख का वादा करने वाले ऑनलाइन धोखेबाजों का शिकार होने के बाद ₹19 लाख का नुकसान हुआ। धोखेबाजों ने विश्वास हासिल किया, विभिन्न बहाने बनाकर पैसे वसूले, और यहां तक कि आयकर अधिकारियों द्वारा गिरफ्तारी की धमकी भी दी अगर अधिक धन नहीं दिया गया। पुलिस ने मामला दर्ज कर लिया है।