Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेनेकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह अनुभवी नेत्यांकडे प्रचाराची धुरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 18:28 IST

Eknath Shinde Shiv Sena 40 Star Campaigners: मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेने त्यांच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली.

राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या ४० स्टार प्रचारकांची अधिकृत यादी जाहीर केली. महापालिकांच्या सत्तासंघर्षात विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी पक्षाने अनुभवी आणि मोठ्या नेत्यांची तगडी फौज मैदानात उतरवली आहे. पक्षाची धोरणे आणि विकासकामे जनतेच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही टीम महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

शिवसेनेने जाहीर केलेल्या या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते, खासदार, आमदार आणि आक्रमक प्रवक्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, स्थानिक पातळीवर जनसंपर्क असलेल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाही या यादीत स्थान देण्यात आले. निवडणूक प्रचार अधिक प्रभावी आणि व्यापक व्हावा, या उद्देशाने पक्षाने आपल्या नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

शिंदेसेना- स्टार प्रचारक यादी

क्र.नावपद 
एकनाथ शिंदेउप-मुख्यमंत्री
रामदास कदमनेते
गजानन कीर्तिकरनेते
आनंदराव अडसूळनेते
श्रीकांत शिंदेखासदार 
प्रतापराव जाधवकेंद्रीय मंत्री
निलमताई गोऱ्हेनेत्या
मीनाताई काकडेनेत्या
गुलाबराव पाटीलनेते व मंत्री
१०दादाजी भुसेउपनेते व मंत्री
११उदय सामंतउपनेते व मंत्री
१२शंभूराज देसाईउपनेते व मंत्री
१३संजय राठोडमंत्री
१४संजय शिरसाटप्रवक्ते व मंत्री
१५भरत गोगावलेउपनेते व मंत्री
१६प्रकाश आबिटकरमंत्री
१७प्रताप सरनाईकमंत्री
१८आशिष जयस्वालराज्यमंत्री
१९योगेश कदमराज्यमंत्री
२०दीपक केसरकरप्रवक्ते व आमदार
२१श्रीरंग बारणेउपनेते व खासदार
२२धैर्यशील मानेखासदार
२३संदीपान भुमरेखासदार
२४नरेश मस्केखासदार
२५रविंद्र वायकरखासदार
२६मिलिंद देवराखासदार
२७दीपक सावंतउपनेते व माजी मंत्री
२८शाहाजी बापू पाटीलउपनेते व माजी आमदार
२९राहुल शेवाळेउपनेते व माजी खासदार
३०मनीषा कायंदेसचिव व आमदार
३१निलेश राणेआमदार
३२संजय निरुपमप्रवक्ते
३३राजू वाघमारेप्रवक्ते
३४ज्योती वाघमारेप्रवक्ते
३५प्रविण सरनाईकयुवासेना कार्याध्यक्ष
३६राहुल लोंढेयुवासेना सचिव
३७अक्षयमहाराज भोसलेप्रवक्ते व अध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना
३८समीर काझीकार्याध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग
३९शायदा एन.सी.राष्ट्रीय प्रवक्त्या
४०गोविंदा अहुजामाजी खासदार

पक्षाने स्पष्ट केल्यानुसार, हे स्टार प्रचारक गेल्या काही काळातील यशस्वी प्रकल्प आणि विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवणे, शिवसेनेची विचारधारा आणि भविष्यातील नियोजित धोरणांचा प्रसार करणे आणि तळागाळातील शिवसैनिकांना सक्रिय करून पक्षाची ताकद वाढवणे, या मुद्द्यांवर भर देतील.

येत्या काही दिवसांत हे सर्व ४० नेते राज्यातील विविध महानगरपालिका क्षेत्रांमध्ये दौरे करणार आहेत. जाहीर सभा, कोपरा सभा आणि थेट जनसंपर्क या माध्यमांतून मतदारांना साद घालण्याचे नियोजन पक्षाने केले आहे. शिवसेनेच्या या आक्रमक रणनीतीमुळे महापालिका निवडणुकीतील रंगत आता अधिकच वाढणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shiv Sena Announces 40 Star Campaigners, Including Govinda, for Polls

Web Summary : Shiv Sena unveils 40 star campaigners, including veterans and Govinda, for upcoming municipal elections. The team will promote party policies and development work, aiming to secure victory in the municipal power struggle through rallies and direct public engagement.
टॅग्स :महानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६एकनाथ शिंदेशिवसेनामुंबई