Join us

Eknath Shinde Mohan Bhagwat: RSS सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटले मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis; सुमारे ४५ मिनिटे चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 23:08 IST

मोहन भागवतांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले, वाचा सविस्तर

Eknath Shinde meets RSS Chief Mohan Bhagwat: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. सोमवारी संध्याकाळी ही भेट झाली. या भेटीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार केला. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी मोहन भागवत यांचे शाल देऊन स्वागत केले. यावेळी शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस होते. मोहन भागवत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाही पुस्तक भेट दिले. मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात ही भेट झाली. सुमारे पाऊण तास यांच्यात चर्चा झाली. त्याबाबत नंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माहिती दिली.

मोहन भागवत यांच्याशी भेटीनंतर काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरसंघचालकांची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना प्रथमच भेटलो. यापूर्वी आम्ही त्यांना भेटलो आहोत. आमचे सरकार हिंदुत्वाच्या विचारसरणीवर उभारण्यात आले आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा वारसा आणि विचारधारा पुढे नेत आहोत आणि त्यासाठी आम्ही त्यांचा आशीर्वाद घेतला."

तत्पूर्वी, सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (MIDC) हीरक महोत्सवी वर्षाबद्दल शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री शिंदे यांनी ६० व्या स्थापना दिनानिमित्त एमआयडीसीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबोधित केले. "हा व्यवसाय गेली ६० वर्षांपासून सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्यामुळे MIDC हे आता विकासाचे दुहेरी इंजिन बनले आहे. वागळे इस्टेटपासून MIDC सुरू झाली. तो माझा मतदारसंघ आहे आणि तिथूनच माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर आणण्यासाठी सर्वच जण प्रयत्नशील आहेत", असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :मोहन भागवतएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराष्ट्रीय स्वयंसेवक संघ