Join us  

एकनाथ खडसे भाजपामध्ये प्रवेश करणार, रोहिणी खडसे उद्या शरद पवारांची भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 11:11 PM

रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. पण, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजूनही उमेदवारी जाहीर केलेली नाही.

आमदार एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ते पुन्हा एकदा भाजपामध्ये घरवापसी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. दरम्यान, रोहिणी खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहणार आहेत. रोहिणी खडसे उद्या शरद पवार यांची भेट घेणार असून रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. 

'नाना पटोलेंचा प्रस्ताव म्हणजे वरातीमागून घोडे'; काँग्रेसच्या ऑफरला प्रकाश आंबेडकरांचे प्रत्युत्तर

रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. पण, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजूनही उमेदवारी जाहीर केलेली नाही. रक्षा खडसे यांच्याविरोधात मोठा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे, या पार्श्वभूमीवरच उद्या रोहिणी खडसे शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

शरद पवार गटाकडून उद्या रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार ठरणार असल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघातून रोहिणी खडसे यांना उमेदवारीची चर्चा सुरू होती.     

एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार

 "माझ्या संकटाच्या काळात शरद पवार यांनी मला साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, पण आता मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे," असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

भाजप प्रवेशाच्या घडामोडीबद्दल बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, "माझी भाजपमधील जुन्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांसोबत अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. त्यांचं म्हणणं होतं की मी पुन्हा भाजपमध्ये यायला हवं. मात्र मी याबाबतचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचं त्यांना कळवलं होतं. परंतु मी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली  आणि पुढील १५ दिवसांच्या आत माझा भाजप प्रवेश होईल," अशी माहिती खडसे यांनी दिली आहे.

गिरीश महाजनांनी केला घणाघाती हल्ला

एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता गिरीश महाजन म्हणाले की, "खडसेंकडे गावातील ग्रामपंचायतही नाही. त्यांच्या पत्नीचा पराभव झालाय, विधानसभा निवडणुकीत त्यांची मुलगीही पराभूत झाली आहे, बँकची सत्ताही गेली, आता त्यांच्याकडे काय राहिले आहे?  जो दिवा विझलेला आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही एवढं का विचारता?" असा सवाल महाजन यांनी केला आहे.

टॅग्स :एकनाथ खडसेरोहिणी खडसेभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार