Join us  

एक थी शेरनी और... खासदार संजय राऊतांवर पुन्हा भडकली कंगना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2020 10:33 PM

कंगना आणि शिवसेना वाद बऱ्यापैकी संपुष्टात आला असला तरी कंगनाकडून वारंवार सरकार आणि खासदार संजय राऊत यांना लक्ष्य करण्यात येत आहे

ठळक मुद्देकंगना आणि शिवसेना वाद बऱ्यापैकी संपुष्टात आला असला तरी कंगनाकडून वारंवार सरकार आणि खासदार संजय राऊत यांना लक्ष्य करण्यात येत आहे

मुंबई - कंगना रणौतच्या अडचणी कमी होण्याचं नावच घेत नाहीयेत. गेल्या महिन्यात तिच्या विरोधात तुमकूर कर्नाटकमद्ये एक आणि मुंबईत दोन केसेस दाखल झाल्या होत्या. आता प्रसिद्ध गीतकार-लेखक जावेद अख्तर यांनी तिच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकलाय. अख्तर यांनी कंगनाच्या एका वक्तव्यावरून ही केस दाखल केली आहे. कंगनाने दावा केला होता की, अख्तर यांनी घरी बोलवून धमकावत हृतिक रोशनला माफी मागण्यास सांगितले होते. याप्रकरणी कंगनावर गुन्हा झाल्याचं खासदारसंजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं. त्यावर, कंगनाने प्रतिक्रिया दिलीय.  

कंगना आणि शिवसेना वाद बऱ्यापैकी संपुष्टात आला असला तरी कंगनाकडून वारंवार सरकार आणि खासदारसंजय राऊत यांना लक्ष्य करण्यात येत आहे. संजय राऊत यांनी काही तासांपूर्वी कंगनावर अंधेरीतील न्याय दंडाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याचं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं. विशेष म्हणजे प्रसिद्ध गायक जावेद अख्तर यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार राऊत यांच्या या ट्विटला कंगनाने रिट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे, 'एक थी शेरनी ..... और एक भेड़ियों का झुंड', असे कंगनाने म्हटले आहे. कंगनाचं नाव घेतल्यामुळे कंगनाने पुन्हा एकदा संजय राऊतांना लक्ष्य केल्याचं दिसून येतंय.  

कंगना व जावेद अख्तर यांच्यातील वाद

स्पॉटबॉयच्या एका रिपोर्टनुसार, जावेद अख्तर यांच्याशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने लिहिले आहे की, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची धमकी दिली गेली नव्हती. जावेद साहब स्वभावाने फार संवेदनशील आहेत. पण हे सगळं फार दिवसांपासून सुरू होतं. आता जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. यात पुढे लिहिले आहे की, केस कोर्टात सुरू आहे आणि जावेद साहब मोठ्या लढाईसाठी तयार आहेत. कोर्टाबाहेर सेटलमेंट करण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे आता कंगनाच्या अडचणी आणखीन वाढणार आहेत.

८ महिन्यांआधी कंगनाची बहीण आणि मॅनेजर रंगोली चंदेलने ट्विट करून जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकावल्याचा आरोप केला होता. तिने लिहिले होते की, 'जावेद अख्तरजी यांनी घरी बोलवलं आणि धमकी दिली की, हृतिक रोशनला माफी माग. महेश भट्ट यांनीही तिच्यावर चप्पल फेकली होती. कारण तिने त्यांच्या सुसाइड बॉम्बर सिनेमात काम करण्यास नकार दिला होता'. (जस्टिन ट्रूडो उत्तर द्या...! आता कंगना राणौत थेट कॅनडाच्या पंतप्रधानांवर बरसली)

दरम्यान, रंगोलीचं हे ट्विट तेव्हा समोर आलं होतं जेव्हा जावेद अख्तर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, 'फासीवाद्यांच्या डोक्यावर शिंग नसतात. फासीवादी फक्त एक विचार आहे. जेव्हा आपण दुसऱ्याचा व्देष करू लागतो तेव्हा तो फासीवाद असतो'.

टॅग्स :कंगना राणौतखासदारसंजय राऊतजावेद अख्तर