Join us  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह २० पैकी आठ मंत्री मराठा समाजाचे; ओबीसी समाजाचे पाच मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 7:18 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आठ मंत्री हे मराठा समाजाचे आहेत.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आठ मंत्री हे मराठा समाजाचे आहेत. त्या खालोखाल ओबीसी समाजाचे पाच मंत्री आहेत. दोन ब्राह्मण, अन्य खुल्या प्रवर्गातील एक, तर  मुस्लिम, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि जैन यांना प्रत्येकी एक प्रतिनिधीत्व मिळाले आहे. ओबीसीमधील कुणबी, तेली आणि वंजारी या जातींना प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही.

मराठा समाजाच्या मंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादा भुसे, संदीपान भुमरे, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण आणि शंभुराज देसाई हे आठ जण आहेत. त्यात भाजपचे तीन, तर शिंदे गटाचे पाच जण आहेत. ओबीसी मंत्र्यांमध्ये गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, अतुल सावे आणि संजय राठोड (व्हीजेएनटी-ओबीसी) आहेत. त्यात शिंदे गटाचे तीन, तर भाजपचे दोन आहेत.

ब्राह्मण समाजाच्या मंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत (कुडाळ देशकर गौड ब्राह्मण) आहेत. सुरेश खाडे अनुसूचित जातीचे तर डॉ.विजयकुमार गावित हे अनुसूचित जमातीचे आहेत. मंगलप्रभात लोढा जैन समाजाचे तर अब्दुल सत्तार हे मुस्लिम आहेत. सुधीर मुनगंटीवार हे आर्यवैश्य समाजाचे (खुला प्रवर्ग) आहेत.

टॅग्स :एकनाथ शिंदेमहाराष्ट्र सरकार