Join us  

पाणीबाणी... राज्यात आठ प्रमुख शहरांना आठवड्यातून एकदाच मिळते पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 7:10 AM

विदर्भ-मराठवाड्याचे सर्वाधिक हाल; मुंबई-कोकण सुखी

मुंबई - तुमचा विश्वास बसणार नाही, पण महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरे अशी आहेत, ज्यांना महिन्यातून फक्त तीन किंवा चारदा पाणीपुरवठा होतो. म्हणजे या शहरांतील नळांना दहा-अकरा दिवसांतून एकदाच पाणी येते. राज्यात ५ शहरे अशी आहेत, ज्यांना तीन ते पाच दिवसांत एकदाच पाणी येते. सहा शहरांना एक ते दोन दिवसांत एकदाच पाणीपुरवठा होतो, तर १३ शहरांची तहान मात्र दररोज भागवली जाते. म्हणजेच, १९ प्रमुख शहरे (प्रामुख्याने जिल्हा मुख्यालये) अशी आहेत, जी दररोज पाण्यापासून वंचित आहेत.

प्रकल्पांतच पाणी नाही, अशातला भाग नाही, तर पाणीपुरवठा यंत्रणेची दररोज पाणीपुरवठ्याची क्षमता नसणे, अमृत योजना रखडणे, प्रचंड पाणीगळती अशी कारणे त्यामागे असल्याचे ‘लोकमत’ चमूने केलेल्या खास पाहणीत आढळून आले आहे. हे चित्र फक्त शहरी भागातील असून ग्रामीण भागात तर परिस्थिती अत्यंत भयावह आहे.

अशी शहरे, अशा झळा

आठवड्यातून एकदाच: यवतमाळ, खामगाव, वाशिम, बीड, जालना, लातूर, औरंगाबाद, अहमदनगर

३ ते ५ दिवसांत एकदाच : अकाेला, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर.

१ ते २ दिवसांत एकदाच: चंद्रपूर, वर्धा, अमरावती, बुलडाणा, जळगाव, हिंगोली.दररोज : नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिराेली, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

उत्तर महाराष्ट्र

कोणत्या शहरांना किती दिवसांनी पाणीपुरवठा?n सहा दिवस व त्यापेक्षा अधिक : अहमदनगरn एक ते दोन दिवसांनी : जळगावn दररोज : नाशिक

पाणीपुरवठा दररोज न होण्याची प्रमुख कारणे

जळगाव : वाघूर नदीतून ९६ एमएलडी पाणी दररोज उचलले जाते. गळतीमुळे २० एमएलडी पाणी वाया जाते.नाशिक : पाणीटंचाई वा कपात नसली तरी पाणीपुरवठ्यात अधून-मधून नियोजनाअभावी विस्कळीतपणा येतो.अहमदनगर : काही भागात चार तर काही भागात आठ दिवसांनी पाणीपुरवठा होतो. त्यामुळे काही भागात टँकरने तहान भागवली जाते.

मुंबई, कोकण कोणत्या शहरांना किती दिवसांनी पाणीपुरवठा?

मुंबई : मुंबईकरांना दररोज पाणीपुरवठा.कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्गला दररोज पाणीपुरवठा.दररोज  : पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.n तीन ते पाच दिवसांनी : सोलापूर.

पश्चिम महाराष्ट्र

पुणे : शहराला दररोज सकाळ-सायंकाळ दोन तास पाणीपुरवठा.

कोल्हापूर : दररोज कमीत कमी चार व जास्तीत जास्त वीस तास पाणीपुरवठा.

सातारा : आठवड्यातून एक दिवस कपात. काही भागात खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा.

सांगली : रोज कमीत कमी एक ते जास्तीत जास्त तीन तास पाणीपुरवठा.

सोलापूर : ४ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. अंतर्गत पाइपलाईन कालबाह्य झाल्या आहेत. पंपगृहाचा वीज पुरवठा अनेकदा खंडीत होतो. तज्ज्ञ अधिकाऱ्यांची कमतरता आहे.

मराठवाडा

औरंगाबाद : शहरात सहाव्या-सातव्या दिवशी पाणीपुरवठा होतो. जायकवाडी धरण आणि हर्सूल तलावातून पाणी येते. महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनांकडे जास्त पाणी आणण्याची क्षमता नाही. १३० एमएलडी पाणी येते. गरज २०० एमएलडी आहे. अनधिकृत नळ ही मोठी डोकेदुखी.नांदेड : मुबलक जलसाठा, पाणीही आरक्षित, पण महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे यंत्रणा अपुरी.बीड : अमृत योजना अपूर्ण, अनधिकृत नळ कनेक्शन, जुनी पाईपलाईन, पालिकेचे ढिसाळ नियोजन.जालना : अंतर्गत पाणीपुरवठा योजना रखडली.लातूर : वितरण व्यवस्थेत दोष, जलवाहिनीतून गळती.उस्मानाबाद : रोज १० एमएलडी पाण्याची तूट. नियोजन ढेपाळलेले.परभणी : वितरणाचे ढिसाळ नियोजन.हिंगोली : तूट वाढू नये म्हणून दोन दिवसांआड पाणी.

विदर्भ

खामगाव : १० ते ११ दिवसांपर्यत पाणीपुरवठा लांबणीवर पडतो. पाइपलाइन जुनी असल्यामुळे वारंवार बिघाड. वाढीव पाणीपुरवठा योजना १३ वर्षांपासून थंड बस्त्यात.चंद्रपूर : अमृत नळयोजनेची कामे अपूर्ण.नागपूर : शहरालगतच्या नेटवर्क नसलेल्या भागाला टँकरने पाणीपुरवठा.वर्धा : रोज पाणी देण्यात तांत्रिक अडचणी.यवतमाळ : मजिप्राच्या नियोजनाच्या अभावामुळे दररोज पाणी मिळत नाही. अमृत योजना पूर्णत्वाच्या मार्गावर.भंडारा : अधूनमधून अशुद्ध पाणी पुरवठा. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम दोन वर्षांपासून संथगतीने. जुन्या पाईपलाईनमुळे गळती.गोंदिया : वैनगंगा नदीचेे पात्र कोरडे पडल्यानंतर उन्हाळ्यात पुरवठ्याची समस्या निर्माण होते.अकाेला : मुख्य जलवाहिनीवर बार्शीटाकाळी परिसरात अवैध जोडण्या. ३० टक्के पाणी गळतीमुळे वाया.अमरावती : ५५ किलोमीटर अंतरावरील मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणातून येते पाणी.गडचिराेली : पाणी वाटपाचे नियाेजन नसल्याने असमताेल पुरवठा.बुलडाणा : शहर पाणीपुरवठा योजनेचा डिझाईन कालावधी संपल्यामुळे दररोज पाणीपुरवठा शक्य नाही.वाशिम : शहराला वर्षभर दाेन दिवसाआड व उन्हाळ्यात मार्चपासून मे शेवटपर्यंत ५ ते ६ दिवसाआड पाणी पुरवठा केला जाताे.

टॅग्स :पाणीनाशिकअहमदनगर