Join us

रेल्वे मार्गावर एकाच दिवशी आठ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 03:20 IST

उपनगरी रेल्वे मार्गावर १२ आॅगस्ट रोजी अपघातांत ८ पुरुष प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला. तर, १७ प्रवासी जखमी झाल्याची नोंद रेल्वे पोलीस ठाण्यात आहे.

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावर १२ आॅगस्ट रोजी अपघातांत ८ पुरुष प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला. तर, १७ प्रवासी जखमी झाल्याची नोंद रेल्वे पोलीस ठाण्यात आहे.सीएसएमटी, डोंबिवली, कल्याण, वाशी, वांद्रे आणि अंधेरी या रेल्वे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एका प्रवाशाचा मृत्यू झाला. ठाणे रेल्वे पोलीस हद्दीत दोन प्रवासी दगावले. तर दादर, कुर्ला, डोंबिवली, कल्याण, चर्चगेट, अंधेरी, वसई, वाशी या रेल्वे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एक प्रवासी जखमी झाल्याची नोंद आहे. ठाणे, पनवेल, मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांच्या हद्दीत दोन, तर वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन प्रवासी जखमी झाले.

टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वेअपघात