Join us  

“बैठकीला गोव्याला न्या”; अनिल परबांची मागणी, नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “तुम्ही रिसॉर्ट सुचवा”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 6:25 PM

Maharashtra Monsoon Session 2023: विधान परिषदेत एका मुद्द्यावर चर्चा करताना सदस्यांमध्ये एकमेकांविरोधात चांगलीच टोलेबाजी झाल्याचे दिसून आले.

Maharashtra Monsoon Session 2023: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, यातच विधान परिषदेत एका मुद्द्यावर सदस्यांमध्ये चर्चा सुरू असताना, बैठकीसाठी गोव्याला न्यायाची मागणी ठाकरे गटाचे सदस्य अनिल परब यांनी केली. यावर सभापती नीलम गोऱ्हे यांनी तुमचा अभ्यास आहे, तुम्ही रिसॉर्ट सुचवा, अशी मिश्लिक प्रतिक्रिया दिली. यावरून सभागृहात एकच हशा पिकला.

राज्याचे शिक्षणाधिकारी यांच्या विभागीय चौकशीबाबत अब्दुल्ला खान दुर्रानी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर चर्चा करतांना अनिल परब आणि दीपक केसरकर यांच्यात टोलेबाजी झाली. यावर उपसभापती निलम गोऱ्हे यांनीही वक्तव्य केले. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अब्दुल्ला खान दुर्रानी यांच्या प्रश्नाला उत्तर दिले. मात्र उत्तरात समाधानी न झालेल्या आमदारांनी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी केली. त्यावर अनिल परब यांनी सूचना करताना, ही बैठक गोवा- सिंधुदुर्ग घेण्यात यावी. मागे आपण काही आमदारांची त्या ठिकाणी व्यवस्था केली होती. हे आम्हाला माहिती आहे. आता आम्हालाही घेऊन जावा आणि आमच्याही शंकेचे निरासन करावे, असा चिमटा काढला.

परब तुम्हाला बैठकीला जायचे आहे का?

नीलम गोऱ्हे यांनी सर्व आमदारांचे मते जाणून घेतले. यावेळी अनिल परब सतत हात वर करत होते. यावेळी  नीलम गोऱ्हे म्हणाल्या, परब तुम्हाला बैठकीला जायचे आहे का?, त्यावर परब म्हणाले माझी सूचना आहे. यावर, तुमचा अभ्यास असेल तुम्ही रिसॉर्ट वैगेर नंतर सांगा, अशी मिश्लिक टिप्पणी नीलम गोऱ्हे यांनी केली.  

टॅग्स :महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३विधान परिषदनीलम गो-हेअनिल परब