Join us

चार शेअर ब्रोकरवर ईडीची छापेमारी, मुंबईसह १६ ठिकाणी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 06:46 IST

मुंबई, दिल्ली, चेन्नईत १६ ठिकाणी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईसह दिल्ली आणि चेन्नई येथे कार्यालय असलेल्या चार शेअर ब्रोकिंग कंपन्यांसह तंत्रज्ञान क्षेत्रातील एका कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छापेमारी करत १ कोटी रुपये रोख तसेच सोने आणि हिऱ्याचे दागिने जप्त केले. या तिन्ही शहरांत मिळून एकूण १६ ठिकाणी ईडीने छापेमारी केली. विशेष म्हणजे, या प्रकरणी ज्या सिक्युअर क्लाऊड या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने तक्रार दाखल केली होती. ती कंपनीच या प्रकरणातील सूत्रधार असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर देखील ईडीने छापेमारी केली.

सिक्युअर क्लाऊड या कंपनीने स्वत:चे काही समभाग चार शेअर ब्रोकिंग कंपन्यांकडे तारण ठेवत त्यावर कर्जाची उचल केली होती. कालांतराने तारण ठेवलेले शेअर या ब्रोकर्सनी खुल्या बाजारात विकत त्याद्वारे १६० रुपयांची कमाई केली. यानंतर सिक्युअर क्लाऊड कंपनीने चेन्नईत पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, यातील आर्थिक व्याप्ती लक्षात घेत हा तपास ईडीकडे वर्ग करण्यात आला होता. 

तक्रारदार कंपनीचा संचालकच सूत्रधारईडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता अशा पद्धतीने व्यवहार करण्यामागे सिक्युअर क्लाऊड कंपनीचे संचालकच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सिक्युअर क्लाऊड कंपनीसह या व्यवहारात गुंतलेल्या चार शेअर ब्रोकर कंपन्यांच्या कार्यालयांवर तसेच कंपन्यांच्या संचालकांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी करत जप्तीची कारवाई केली.

 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीव्यवसाय