म्युझिक कंपन्यांवर ईडीचे छापे; टी सीरिज, यशराजचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 17:35 IST2017-11-03T16:37:04+5:302017-11-03T17:35:56+5:30
मुंबईतील म्युझिक कंपन्यांवर आज ईडीनं (अंमलबजावणी संचालनालय ) छापे मारल्याचे वृत्त समोर आले आहे.

म्युझिक कंपन्यांवर ईडीचे छापे; टी सीरिज, यशराजचा समावेश
मुंबई - मुंबईतील म्युझिक कंपन्यांवर आज ईडीनं (अंमलबजावणी संचालनालय ) छापे मारले आहेत. यामध्ये टी सीरिज, यशराज, सारेगामा आणि सोनी यांचा समावेश आहे. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये भारतात आणल्याचा आरोप या कंपन्यांवर आहे.
अंमलबजावणी संचलनालयाने टी सीरिज, यशराज, सारेगम, युनिव्हर्सल आणि सोनी या प्रख्यात म्युझिक कंपन्यांच्या कार्यालयावर छापे टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपातून शुक्रवार सकाळपासून या कंपन्यांमध्ये ईडी तपास करत आहे.