मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:16 IST2025-10-08T11:14:12+5:302025-10-08T11:16:42+5:30
Salim Dola latest News: देशात सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करी आणि विक्री प्रकरणात ईडीने दाऊदशी कनेक्शन असलेल्या माणसाची नाकेबंदी सुरू केली आहे. सलीम डोलाच्या मुंबईतील ८ ठिकाणांवर धाडी टाकल्या.

मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
Salim Dola Drugs Case: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या जवळचा असलेल्या सलीम डोलाचे ड्रग्ज नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी ईडीने कारवाई सुरू केली आहे. ईडीने सलीम डोलाशी संबंधित मुंबईतील आठ ठिकाणांवर धाडी टाकल्या. बुधवारी (८ ऑक्टोबर) सकाळी धाडी टाकून मालमत्तांची झाडाझडती सुरू आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फैसल जावेद शेख आणि अल्फिया फैसल शेख हे ड्रग्ज रॅकेट चालवतात. त्यांचा थेट संबंध सलीम डोलाशी आहे. याच प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.
सलीम डोलाशी फैसल शेखचे कनेक्शन
ईडीने केलेल्या तपासात असे आढळून आले की, ड्रग्ज नेटवर्क चालवणारा फैसल शेख हा ड्रग्ज तस्करी करणाऱ्या नेटवर्कचा म्होरक्या सलीम डोलाच्या माध्यमातून एमडी (मेफेड्रोन ड्रग) खरेदी करत होता.
सलीम डोला हा बऱ्याच काळापासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. त्याच्यावर अंमली पदार्थंची तस्करी आणि हवालाच्या मार्फत पैशांची देवाण-घेवाण करण्याचा आरोप आहे. एनसीबीने त्याची माहिती देणाऱ्याला बक्षीस देण्याचीही घोषणा केली आहे.
डोलाचा मुलगा अटकेत
दाऊद इब्राहीमशी संबंध असलेल्या सलीम डोलाच्या मुलाला यावर्षीच दुबईतून भारतात आणण्यात आले. याच वर्षी जूनमध्ये त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले होते. सलीम डोला एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात तस्करी करताना मोठा साठा पकडला गेलेला आहे. सलीम डोलाचा मुलगा ताहीरही याच धंद्यात आहे.