Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईडीची कारवाई : वाधवान बंधूच्या ५ आलिशान वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 12:51 IST

वाधवान बंधूच्या पाच आलिशान मोटारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केल्या.

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या पत्राच्या आधारे खंडाळा ते महाबळेशवर असे पर्यटन करणाऱ्या वाधवान बंधूच्या पाच आलिशान मोटारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केल्या. त्यामध्ये दोन  रेंज रोव्होलर आणि तीन फॉर्च्युनरसचा समावेश आहे.  सातारा पोलिसांना त्याबाबत लेखी सूचना देण्यात आल्या असून लॉकडाऊन संपल्यानंतर  त्या ताब्यात घेतल्या जातील, असे  अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले.  

प्रधान सचिव (गृह ) अमिताभ गुप्ता याचे पत्र घेऊन कपिल वाधवान, त्याचा भाऊ धीरज  अरुण,  कार्तिक वाधवान यांच्यासह 23 जण खंडाळा येथील रेस्ट हाऊसमध्ये  मुक्काम करून गुरुवारी महाबळेशवरकडे निघाले होते. पोलिसांनी त्यांना अडवून चोकशी केली असताना 

  गुप्ता यांनी त्यांना  दिलेल्या पत्राची बाब समोर आली. वाधवान बंधूवर  गुन्हा दाखल करून त्यांच्या पाचही आलिशान कार जप्त केल्या. 

येस बँकेच्या घोटाळ्यात डीएचएफएलला दिलेले 5 हजार कोटीचे थकीत कर्ज असलेली बाब उघडकिस आले आहे. या प्रकरणी ईडीने त्याच्यावर मनी लॉंड्रीग अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. केंद्रीय गुन्हा अनवेषन    (सीबीआय ) गुन्हा दाखल आहे. त्यांची अजामीन पात्र अटकपूर्व वारन्ट बजाविले आहे. त्यावर सद्या कोरोना विषाणूचा धोका असल्याने चोकशी हजर राहू शकत त्यांनी सीबीआयला कळविले आहे. मनी लॉंड्रीगमधून या  आलिशान कार खरेदी केल्या गेल्या आहेत, त्यामुळे त्या आम्ही ताब्यात घेत असल्याचे ईडीने सातारा पोलिसांना पत्र देऊन कळविले आहे. लॉक डाऊनच्या काळात त्या गाड्या सातारा येथेच असतील, त्यानंतर  ईडी मुंबईला घेऊन येणार आहे. 

दरम्यान, वाधवान बंधूना पत्र देणाऱ्या प्रधान सचिव (गृह ) अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्याची चौकशी अव्वर मुख्य सचिव(वित्त ) मनोज सोनीक  यांच्याकडून 15 दिवसाच्या मुदती मध्ये केली जाणार आहे.  या दरम्यान गुप्ता यांचा अतिरिक्त पदभार  अव्वर मुख्य सचिव(अपील व सुरक्षा ) श्रीकांत सिह यांच्याकडे देण्यात आला आहे.

टॅग्स :गुन्हेगारीकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस