earthquake of magnitude 2.8 on richer scale 10 km depth occurred 91 km north of mumbai | उत्तर मुंबईला भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

उत्तर मुंबईला भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई- गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. विशेष म्हणजे या कोरोनाच्या संकटात अनेक देशांना भूकंपाचा सामनाही करावा लागत आहे. राज्यातील बऱ्याच भागात भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. महाराष्ट्रातील उत्तर मुंबईतही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे हे धक्के सौम्य होते. त्यात कोणतीही वित्तहानी झालेली नाही. उत्तर मुंबईपासून 98 किमीअंतरावर या भूकंपाचं केंद्रबिंदू असून, त्याची तीव्रता 2.7 मॅग्निट्युट असल्याची माहिती आहे. आज सकाळी 6.36 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळाली आहे. कालसुद्धा राज्याच्या उत्तर मुंबईच्या उत्तरेस 91 किमीवर भूकंपाचे धक्के जाणवले होते. 

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी-एनसीएस) च्या मते, रिश्टर स्केलवर भूकंपाचे प्रमाण 2.8 मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी या भूकंपाविषयी माहिती सामायिक केली आहे. रिपोर्ट्सनुसार, मुंबईत हादरे येताच लोक घराबाहेर पडू लागले. मुंबईत कोरोनाची दहशत वेगानं पसरत आहे. त्यातच भूकंपाच्या धक्क्यांनी लोक पुरते बिथरले आहेत.


पालघरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शुक्रवारी(4 सप्टेंबर) रोजी रात्री 11.42 वाजता डहाणू तालुक्यातील झाई-बोर्डी परिसरात  मोठा भूकंपाचा धक्का बसला, तर दुसरा धक्का रात्री 12.05 वाजता बसला असून, चार रिश्टर स्केल एवढी त्याची तीव्रता मोजण्यात आली आहे. परिसरातील लोक घाबरून घरातून रस्त्यावर उभी राहिली होती.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: earthquake of magnitude 2.8 on richer scale 10 km depth occurred 91 km north of mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.