ई-वाहनांना येत्या ८ दिवसांत टोलमाफी, भरलेला मिळणार; राहुल नार्वेकर यांनी दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 05:40 IST2025-12-11T05:37:55+5:302025-12-11T05:40:09+5:30

ई-वाहन धोरण २०२५ अंतर्गत समृद्धी आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे आणि अटल सेतू या तीन महामार्गांवर टोलमाफी लागू करण्याचा जीआर २५ मे २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे.

E-vehicles will get toll waiver and payment in the next 8 days; Rahul Narvekar orders | ई-वाहनांना येत्या ८ दिवसांत टोलमाफी, भरलेला मिळणार; राहुल नार्वेकर यांनी दिले आदेश

ई-वाहनांना येत्या ८ दिवसांत टोलमाफी, भरलेला मिळणार; राहुल नार्वेकर यांनी दिले आदेश

मुंबई : राज्य सरकारने ई-वाहनांना टोल माफी जाहीर केली. तरीही टोलवसुली होत असून जनतेला सरकारने दिलेला शब्द मोडला जात आहे. त्यामुळे पुढच्या आठ दिवसांत एकाही ई-वाहनाकडून टोल वसूल केला जाऊ नये,  असे स्पष्ट आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी विधानसभेत दिले आहेत.

ई-वाहन धोरण २०२५ अंतर्गत समृद्धी आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे आणि अटल सेतू या तीन महामार्गांवर टोलमाफी लागू करण्याचा जीआर २५ मे २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे. टोलमाफीचा जीआर जारी झाल्यापासून ज्या ई-वाहनांकडून टोल वसुली झाली, त्यांची रक्कम परत देण्यात यावी, असे आदेशही अध्यक्षांनी सरकारला दिले आहेत.

Web Title : ई-वाहनों को 8 दिनों में टोल छूट: आदेश जारी

Web Summary : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ने आठ दिनों के भीतर ई-वाहनों को तत्काल टोल छूट देने का आदेश दिया। जीआर जारी होने के बाद से निर्दिष्ट राजमार्गों पर पहले एकत्र किए गए टोल का रिफंड अनिवार्य है।

Web Title : E-vehicles to get toll exemption in 8 days: Orders issued

Web Summary : Speaker Rahul Narwekar ordered immediate toll exemption for e-vehicles within eight days. Refunds are mandated for previously collected tolls on specified highways since the GR issuance.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.