म्हाडातील ई-रजिस्ट्रेशनला मिळाला अखेर मुहूर्त

By Admin | Updated: September 4, 2014 02:26 IST2014-09-04T02:26:07+5:302014-09-04T02:26:07+5:30

खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या दस्तऐवजाची ई-नोंदणी (ई-रजिस्ट्रेशन) सेवा म्हाडाच्या मुख्यालयात कार्यान्वित करण्याच्या उपक्रमाला अखेर एकदाचा ‘मुहूर्त’ मिळाला आहे.

E-registration of MHADA is finally completed | म्हाडातील ई-रजिस्ट्रेशनला मिळाला अखेर मुहूर्त

म्हाडातील ई-रजिस्ट्रेशनला मिळाला अखेर मुहूर्त

मुंबई : सदनिका, दुकान गाळ्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या दस्तऐवजाची ई-नोंदणी (ई-रजिस्ट्रेशन) सेवा म्हाडाच्या मुख्यालयात कार्यान्वित करण्याच्या उपक्रमाला अखेर एकदाचा ‘मुहूर्त’ मिळाला आहे. कोकण मंडळाकडून राबविण्यात येणा:या या प्रकल्पाचे उद्घाटन येत्या शनिवारी (दि. 6) राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
ई-रजिस्ट्रेशनच्या सुविधेमुळे नागरिकांना उपनिबंधक कार्यालयात घालाव्या लागणा:या येरझा:या थांबण्याबरोबरच दलालाकडून होणा:या लुटीला आळा बसणार आहे. मात्र त्यासाठी संबंधित लाभार्थी दाम्पत्य आणि त्यांच्या दोन साक्षीदारांकडे आधारकार्ड असणो  आवश्यक असणार आहे. टप्प्याटप्प्याने ही योजना मुंबई मंडळ व अन्य विभागीय कार्यालयांत राबविली जाणार असल्याचे अधिका:यांकडून सांगण्यात आले. या प्रकल्पाबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने 1 जुलैला दिले होते. 
एखाद्या घर, भूखंडाचा खरेदी व्यवहार झाल्यानंतर त्याबाबत मुद्रांक, नोंदणी शुल्क भरल्यानंतरही त्या दस्तऐवजाची नोंदणी संबंधित क्षेत्रतील उपनिबंधक कार्यालयात करणो बंधनकारक आहे. त्यानंतर त्या वस्तू, भूखंडाचा ताबा घेता येतो,  म्हाडाने दोन वर्षापूर्वी  मीरा रोड येथील 16क्क् घरांच्या सोडत विजेत्यांना  या सदनिकांचे वितरण सुरू आहे. त्यापैकी 5क्क् जणांची नोंदणी झाली आहे. या कामासाठी विजेत्यांना म्हाडाचे कार्यालय व मीरा रोडमधील नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात वारंवार येरझा:या घालाव्या लागत होत्या. त्या कामासाठी अर्जदाराला 2क्क् रुपये शुल्क लागत असताना लवकर काम करून घेण्यासाठी दलालांना दोन ते अडीच हजार रुपये खर्च करावे लागतात, अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या. (प्रतिनिधी)
 
च्तक्रारी वाढल्याने कोकण मंडळामध्ये त्यासाठी एक स्वतंत्र कक्ष बनविला जाणार असून नोंदणीबाबत संगणकावर स्वतंत्र ‘टेम्प्लेट’ बनविला जाणार आहे. 2 दिवसांमध्ये त्यांची ‘ऑनलाइन’ सही झाल्यानंतर त्याची प्रत नागरिकांना उपलब्ध करून दिली जाईल, असे मुख्य अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.

 

Web Title: E-registration of MHADA is finally completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.