आठवी पासही बनला डॉक्टर..., देवनारमधून ३ बोगस डॉक्टरांना बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 06:05 AM2017-11-25T06:05:51+5:302017-11-25T06:06:05+5:30

मुंबई : चुकीच्या वैद्यकीय उपचारामुळे प्रदीप जाधव (२५) या तरुणाच्या मृत्यूच्या घटनेनंतर, देवनार पोलिसांनी अन्य बोगस डॉक्टरांच्या दिशेने मोर्चा वळविला.

Dvd passed the eighth pass, ... 3 bogus doctors were arrested from Deonar | आठवी पासही बनला डॉक्टर..., देवनारमधून ३ बोगस डॉक्टरांना बेड्या

आठवी पासही बनला डॉक्टर..., देवनारमधून ३ बोगस डॉक्टरांना बेड्या

googlenewsNext

मुंबई : चुकीच्या वैद्यकीय उपचारामुळे प्रदीप जाधव (२५) या तरुणाच्या मृत्यूच्या घटनेनंतर, देवनार पोलिसांनी अन्य बोगस डॉक्टरांच्या दिशेने मोर्चा वळविला. नेहरूनगर, गोवंडी, टिळकनगर आणि मानखुर्द परिसरात टाकलेल्या छाप्यादरम्यान, तीन बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. यामध्ये ८वी नापास असलेल्या बोगस डॉक्टरचाही समावेश आहे. त्याच्यासह तिघांवर परिमंडळ ६ने कारवाई केली आहे.
देवनार परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून वैद्यकीय पदवी नसतानाही शाहबाज आलम मोहम्मदने बोगस दवाखाना थाटला होता. त्याच्याकडेच घेतलेल्या उपचारामुळे ८ नोव्हेंबर रोजी जाधवचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवनार पोलिसांनी शाहबाजला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, परिमंडळ ६ च्या पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत पथकाने अशा डॉक्टरांचा शोध सुरू केला.
नेहरूनगर, गोवंडी, टिळकनगर आणि मानखुर्द परिसरातील दवाखान्यांची झडती घेतली. या दरम्यान, नेहरूनगरमधून जहीर बशीर अहमद शेख (३६) याला अटक करण्यात आली. १२वी पास असलेला शेख कुर्ला पूर्वेकडील बर्वे मार्गातील ‘क्रांती आयुर्वेदिक’ नावाने दवाखाना चालवत होता.
११वी पास असलेल्या फरमनअली जाहिद हुसेन बेग (२१) याला गोवंडीतून अटक करण्यात आली. चेंबूरमधील एका शॉपमध्ये त्याचा दवाखाना सुरू होता, तर टिळकनगरमधून आसिफ हुसेन वली अहमद शेख (४७) याला अटक करण्यात आली. तो फक्त ८वी पास होता. तोही चेंबूर फाटक परिसरात छोटासा दवाखाना थाटून उपचार करत असे. अन्य बोगस डॉक्टरांचाही शोध पोलिसांकडून सुरू आहेत. नेहरूनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पाटील, सुभाष राठोड, टिळकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शंकर धायगुडे, अमोल आंबवणे यांच्यासह तपास पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title: Dvd passed the eighth pass, ... 3 bogus doctors were arrested from Deonar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.