Join us  

राज्यात लॉकडाऊन काळात अपघातांमध्ये ६९ टक्के घट, मृत्यूही घटल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 2:55 AM

२५ मार्च ते ३१ मेदरम्यान राज्यात अपघातांत ६९ टक्के घट झाली तर अपघाती मृत्यूचे प्रमाण ६१ टक्क्यांनी कमी झाले आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. वाहतुकीवर काही निर्बंध लादण्यात आले होते. २५ मार्च ते ३१ मेदरम्यान राज्यात अपघातांत ६९ टक्के घट झाली तर अपघाती मृत्यूचे प्रमाण ६१ टक्क्यांनी कमी झाले आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.राज्यात गेल्या वर्षी २५ मार्च ते ३१ मेदरम्यान एकूण ६५४४ अपघात झाले होते. यामध्ये २६५५ मृत्यू तर ५८३५ जण जखमी झाले होते. तर यावर्षी लोकडाऊनमध्ये २०३७ अपघात झाले. त्यात १०३२ जणांचा मृत्यू झाला तर १६४१ जण जखमी झाले. अपघातांचे प्रमाण ६९ तर मृत्यूत ६१ टक्यांनी कमी झाले आहे. जखमींचे प्रमाण ७२ टक्यांनी घटले आहे. या अहवालानुसार राज्यात मुंबई शहरात अपघातात ८१ टक्के आणि मृत्यू ७४ टक्के , जखमीत ८३ टक्के घट झाली आहे. गेल्यावर्षी २५ मार्च ते ३१ मे दरम्यान एकूण ५३८ अपघात झाले होते. यामध्ये ८२ मृत्यू तर ५७५ जण जखमी झाले होते. तर यावर्षी लॉकडाऊन काळात १०४ अपघात झाले त्यामध्ये २१ जणांचा मृत्यू झाला तर ९६ जण जखमी झाले.राज्यात वेगाचे ४४ टक्के बळीराज्यात लॉकडाऊन काळात २५ मार्च ते ३१ मेदरम्यान एकूण १०३२ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. यामध्ये ४४ टक्के मृत्यू हे भरधाव वेगाने वाहन चालविल्यामुळे झाले आहेत. तर १८ टक्के अपघाती मृत्यू हे धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्यामुळे झाले आहेत. वाहन दोष, चालकाच्या दुर्लक्षामुळे २५ टक्के अपघात झाले. तर इतर कारणांमुळे१३ टक्के मृत्यू झाले.

टॅग्स :अपघातमहाराष्ट्र