During the evening hours, the bushes will be on the road; Municipal run for sanitation survey | संध्याकाळच्या वेळेतही रस्त्यावर झाडू फिरणार; स्वच्छता सर्वेक्षणासाठी महापालिकेची धावपळ
संध्याकाळच्या वेळेतही रस्त्यावर झाडू फिरणार; स्वच्छता सर्वेक्षणासाठी महापालिकेची धावपळ

मुंबई : गेल्या वर्षी स्वच्छता सर्वेक्षणात झालेल्या घसरणीमुळे मुंबईची नाचक्की झाली. त्यामुळे यंदा केंद्र सरकारच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू आहे. त्यानुसार आता केवळ सकाळची नव्हे तर संध्याकाळच्या वेळेतही रस्त्यावर झाडू मारण्यात येणार आहे. ही मोहीम तूर्तास मुंबईतील निवडक ४१ रस्त्यांवर राबविण्यात येणार आहे.

दरवर्षी केंद्र सरकारमार्फत स्पर्धक शहरातील स्वच्छतेचे सर्वेक्षण करून सर्वाेत्तम शहरांना एक ते सात रेटिंग देण्यात येते. मात्र गेल्या वर्षी इंदौर आणि नवी मुंबईसारख्या छोट्या शहरांनीही मुंबईला मागे टाकले होते. त्यामुळे कचरा अधिभार नागरिकांकडून वसूल करणे, ओला व सुका कचऱ्याचे शंभर टक्के वर्गीकरण, ओला कचºयावर प्रक्रिया करण्याची मोठ्या सोसायट्यांना सक्ती अशा नियमांवर अंमल होऊ लागला आहे.

मात्र पंचतारांकित रेटिंगसाठी असलेल्या निकषाने महापालिकेची गोची केली आहे. मुंबई शहर सकाळ-संध्याकाळ साफ ठेवण्याच्या अटीने पालिकेची तारांबळ उडवली आहे. स्वच्छता निरीक्षक याची पाहणी करण्यासाठी पुढच्या सोमवारी मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपापल्या विभागातील रस्त्यांवर संध्याकाळची साफसफाई करण्याचे आदेश प्रशासनाने सर्व विभागांना दिले आहेत.
च्नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह, चर्चगेट अशा अति महत्त्वाच्या तसेच वर्दळीच्या व बाजारपेठ असलेल्या रस्त्यांच्या सफाईवर भर देण्यात येत आहे.

४ ते ३१ जानेवारी या काळात स्वच्छ भारत अभियानाचे सर्वेक्षण होणार आहे. गेल्या वर्षी मुंबईचा ४९ वा क्रमांक आला होता.
च्कचरा उचलण्यासाठी नागरिकांकडून कर वसूल करण्यात येत नसल्यामुळे मुंबई शहर गतवर्षी थ्री स्टार रेटिंगमध्ये बाद ठरले होते.
च्१५ ते ३१ डिसेंबर दरम्यान केंद्राचे स्वच्छता पथक मुंबईत पाहणीसाठी येणार आहे.

Web Title: During the evening hours, the bushes will be on the road; Municipal run for sanitation survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.