During the day, 13,294 patients in the state became corona free | राज्यात दिवसभरात १३,२९४ रुग्ण झाले कोरोनामुक्त

राज्यात दिवसभरात १३,२९४ रुग्ण झाले कोरोनामुक्त

मुंबई : राज्यात शुक्रवारी दिवसभरात १५ हजार ५९१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने आतापर्यंतची रुग्णसंख्या १४ लाख १६ हजार ५१३ झाली आहे, तर दिवसभरात १३ हजार २९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ११ लाख १७ हजार ७२० झाली आहे.

राज्यात आज ४२४ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या मृत्युदर २.६५ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९१ टक्के आहे. आज नोंदविण्यात आलेल्या ४२४ मृतांमध्ये २७२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ६५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ८७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

या ८७ मृत्युंमध्ये ठाणे ५, पुणे ७, नाशिक ६, कोल्हापूर ३, पालघर २, चंद्रपूर २, जळगाव १, सातारा ३२, नागपूर १४, रत्नागिरी १, सिंधुदुर्ग १, वर्धा १, सांगली २ आणि मध्य प्रदेशातील १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत राज्यात ३७ हजार ४८० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात २१ लाख ९४ हजार ३४७ रुग्ण होम क्वारंटाइन, तर २९ हजार ५१ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात कोरोनाचे २,४४० रुग्ण; ४२ मृत्यू
मुंबईत शुक्रवारी २,४४० कोरोनाचे रुग्ण आढळले असून ४२ मृत्यू झाले. रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर १.०६ टक्के आहे. आतापर्यंत एकूण दोन लाख ९९ हजार ३४ रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात १,३५८ रुग्ण बरे झाले. यामुळे एकूण ८२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण बळींचा आकडा ९,०११ आहे. सक्रिय २८,४७२ रुग्ण असून आतापर्यंत एक लाख ७२ हजार ३६ रुग्ण बरे झाले आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: During the day, 13,294 patients in the state became corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.