बिल्डरसह दोघे अटकेत

By Admin | Updated: May 19, 2014 04:58 IST2014-05-19T04:58:34+5:302014-05-19T04:58:34+5:30

म्हाडातर्फे केलेल्या परिशिष्ट २मध्ये पूर्वीच्या नोंदीनुसार १३९ सभासदांना समाविष्ट करणे आवश्यक होते. मात्र २७८ झोपडीधारकांचा त्यात समावेश केला.

The duo with the builder | बिल्डरसह दोघे अटकेत

बिल्डरसह दोघे अटकेत

मुंबई : अंधेरी (पश्चिम) येथील नवभारत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झोपडपट्टी सुधार योजनेत बनावट कागदपत्रांच्या आधारे अपात्र झोपडीधारकांनाही पात्र दाखवून फसवणूक केल्याच्या आरोपावरून पोलिसांच्या आर्थिक गुन्हेविरोधी विभागाने गजाली नासर आणि सलीम ताहिर बेग या दोघांना अलिकडे अटक केली. यातील एकाची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. २00६च्या दरम्यान सलीम ताहीर बेग, मुनाफ शेख आणि त्यांच्या हस्तकांनी सोसायटीत येऊन ती जागा आपल्याला म्हाडाने पुनर्विकासासाठी दिल्याचे सांगत रहिवाशांच्या सह्या घेत त्यांच्याकडील कागदपत्रे हस्तगत केली होती. रहिवाशांनी चौकशी केली असता म्हाडा अधिकार्‍यांनी ती जागा एसआरएकडे सोपवल्याचे सांगितले. त्यानंतर म्हाडातर्फे केलेल्या परिशिष्ट २मध्ये पूर्वीच्या नोंदीनुसार १३९ सभासदांना समाविष्ट करणे आवश्यक होते. मात्र २७८ झोपडीधारकांचा त्यात समावेश केला. १३९ सभासदांव्यतिरिक्त वाढीव सभासद बनावट कागदपत्रांच्या आधारे समाविष्ट केल्याने सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी त्याला आक्षेप घेतल्यानंतर विकासकाने रहिवाशांना खोटी आश्वासने देत फसवणूक केल्याची तक्रार येथील रहिवासी जफर जमालुद्दीन शेख यांनी केली. युसूफ अहमद काझी, अब्दुल हलीम कुरेशी, सायराबानू फारूख सुलतान, विद्यापती कपिलेश्वर मिस्त्री आणि नियाज अहमद खान यांची मृत्यू प्रमाणपत्रे सादर करीत मृत व्यक्तींना पात्र सभासद म्हणून दाखविल्याचे पुरावे दिले. आॅगस्ट २0११मध्ये पोलिसांनी बिल्डर नासर असोसिएट्स, गजाली नासर, सलीम ताहीर बेग, मुनाफ शेख व सहकार उपनिबंधक कार्यालयाचे प्रशासक के.डी. पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हे प्रकरण आर्थिक गुन्हेविरोधी विभागाकडे सोपविल्यानंतर दोघांना अटक केली. अन्य आरोपींच्या सहभागाची चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The duo with the builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.