Join us

डंपरच्या धडकेत दाम्पत्य ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 05:15 IST

एका भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दाम्पत्य जागीच ठार झाल्याची घटना विक्रोळी येथील पूर्व द्रुतगती मार्गावरील पूलाच्या वळणारवर शनिवारी घडली.

मुंबई - एका भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दाम्पत्य जागीच ठार झाल्याची घटना विक्रोळी येथील पूर्व द्रुतगती मार्गावरील पूलाच्या वळणारवर शनिवारी घडली. अक्षय प्रमोद गुप्ता (वय ३५), त्याची पत्नी आरती गुप्ता (३३) अशी पीडितांची नावे असून याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय गुप्ता पत्नीसोबत खरेदी करुन स्कुटरवरुन (एम.एच.-४ जी.व्ही.१८६६) घरी चालले होते. मेहता पूलाच्या चढणावर पाठीमागून आलेल्या डंपरने धडक दिल्याने दोघे रस्त्यावर पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले.डंपर चालक गाडी न थांबविता निघून गेला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले़ या घटनेमुळे विभागात हळहळ व्यक्त करण्यात आली़ आरोपीला तत्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाश्यांनी केली़

टॅग्स :अपघातमुंबई