Join us

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 14:08 IST

कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

मुंबई - कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या ट्रेन विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील वीर आणि माणगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे घोड नदीच्या पाण्याची पातळी धोकादायक पातळीपर्यंत वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा विचारात घेऊन या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-दादर पॅसेंजर वीर स्थानकात थांबवण्यात आली आहे. तर दिवा-सावंतवाडी पॅसेंजर कोलाड स्थानकात थांबवण्यात आली आहे. मंगला एक्स्प्रेस करंजाडी स्थानकात थांबवण्यात आली आहे. तर सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस रोहा स्थानकात थांबवण्यात आली आहे. 

टॅग्स :कोकण रेल्वेपाऊसरायगड