निवडणुकीमुळे मुंबईसह कोकणात 3 दिवस ड्राय डे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 15:08 IST2018-06-22T15:08:03+5:302018-06-22T15:08:03+5:30
तीन दिवस मुंबई आणि कोकण किनारपट्टीलगतच्या भागात ड्राय डे असणार आहे. यामुळे वीकेंडला कोकणवारी करण्यांची निराशा होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीमुळे मुंबईसह कोकणात 3 दिवस ड्राय डे
ठाणे : तीन दिवस मुंबई आणि कोकण किनारपट्टीलगतच्या भागात ड्राय डे असणार आहे. यामुळे वीकेंडला कोकणवारी करण्यांची निराशा होण्याची शक्यता आहे. कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक सोमवार २५ जूनला होत असून शनिवार २३ जून ते सोमवार २५ जूनपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्याचप्रमाणे गुरुवारी (२८ जून) मतमोजणीच्या दिवशी मद्य विक्री व्यवहार पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक एन. जी. घुले यांनी दिले आहेत.
मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे निवडणुका मुक्त, निर्भय आणि खुल्या वातावरणात पार पडण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार मतदान सुरू होण्यापूर्वी ४८ तास अगोदर व मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस पाळण्याचे बंधन आहे.
विदेशी मद्य, देशी दारू, ताडी दुकानांना हा आदेश लागू असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांची अनुज्ञप्ती रद्द करून फोजदारी कारवाई करण्यात येईल.