Drunk and Drive Fine Mumbai: दारूच्या नशेत गाडी चालविणाऱ्या ६,९१७ जणांची पोलिसांनी उतरवली झिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 14:09 IST2024-10-09T14:08:19+5:302024-10-09T14:09:03+5:30
Drunk and Drive Fine Mumbai: दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या चालकांची वाहतूक पोलिसांनी चांगलीच झिंग उतरवली आहे.

Drunk and Drive Fine Mumbai: दारूच्या नशेत गाडी चालविणाऱ्या ६,९१७ जणांची पोलिसांनी उतरवली झिंग!
मुंबई :
दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या चालकांची वाहतूक पोलिसांनी चांगलीच झिंग उतरवली आहे. यावर्षी पहिल्या ९ महिन्यांत ६ हजार ९१७ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सहा पटीने या कारवाईत वाढ झाली आहे.
वाहतूक पोलिसांनी गेल्या नऊ महिन्यांत रस्त्यावर दारूच्या नशेत वाहन चालवून स्वतःसह दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली. सहपोलिस आयुक्त अनिल कुंभारे यांच्या नेतृत्वात यावर्षी या कारवाईचा वेग वाढला आहे. गेल्यावर्षी १ हजार २१७ जणांवर कारवाई करण्यात आली होती. यावर्षी कारवाईचा आकडा हा ६,९१७ वर पोहोचला आहे. जानेवारी महिन्यात ५२६ जणांवर कारवाई केली आहे.
अल्पवयीन मुलांना मद्य देणारेही रडारवर
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणानंतर मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी करत ड्रंक अँड ड्राइव्हविरोधात मुंबई पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला. बार, पबची तपासणी करत मुंबईत विशेष मोहिमेअंतर्गत शहरात सर्वत्र गस्त घालण्यात आली. पवई, दादरमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य दिल्याप्रकरणी कारवाईही करण्यात आली आहे. अशाच प्रकारे मुंबईतील अन्य ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे.
जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान केलेली कारवाई