अंधेरीतील टीव्ही कलाकाराच्या घरातून ड्रग्ज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:05 IST2021-04-04T04:05:58+5:302021-04-04T04:05:58+5:30

एनसीबीची कारवाई; संशयित परदेशी मैत्रिणीसह पसार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) अभिनेता एजाज खानकडील ...

Drugs seized from TV artiste's house in Andheri | अंधेरीतील टीव्ही कलाकाराच्या घरातून ड्रग्ज जप्त

अंधेरीतील टीव्ही कलाकाराच्या घरातून ड्रग्ज जप्त

एनसीबीची कारवाई; संशयित परदेशी मैत्रिणीसह पसार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) अभिनेता एजाज खानकडील चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात एका टीव्ही कलाकाराच्या घरी छापा टाकून अमली पदार्थ जप्त केले. मात्र, पथक पोहोचण्याच्यापूर्वीच तो तेथून पळ काढण्यात यशस्वी झाला. त्याच्यासाेबत त्याची परदेशी मैत्रीण असल्याचे समजते.

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने बी ग्रेड अभिनेता एजाझ खानला मागच्या मंगळवारी अटक केली. ड्रग्ज माफिया बटाटा पिता-पुत्राशी त्याचे ड्रग्ज कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला विमानतळावरून ताब्यात घेतले होते. त्याच्याकडील कसून चौकशीतून अनेक नावे समोर येत आहेत. त्याआधारे लोखंडवाला परिसरात राहणाऱ्या एका टीव्ही कलाकाराच्या घरी एनसीबीच्या पथकाने शुक्रवारी छापा टाकला. या झडतीत एमडी व अन्य ड्रग्ज सापडले. मात्र, तो व त्याच्यासाेबत राहात असलेली परदेशी तरुणी तेथून निघून गेले होते. दोघेजण टीव्ही मालिकांमध्ये दुय्यम दर्जाच्या भूमिका करतात. ते एजाजच्या नित्य संपर्कात होते. त्याच्या सांगण्यावरून पार्टीमध्ये ते हजर राहात होते. त्यामध्ये ते ड्रग्ज घेत असत, अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे. दाेघांचाही शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Drugs seized from TV artiste's house in Andheri