Join us
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्स तस्कर ललित पाटीलच्या पोलीस कोठडीत २७ ऑक्टोबरपर्यंत वाढ

By रतींद्र नाईक | Updated: October 23, 2023 15:29 IST

पुण्याच्या ससून रुग्णालयातून दोन आठवड्यापूर्वी पळून गेलेल्या ललित पाटील याला पोलिसांनी बंगळुरू येथून ताब्यात घेतले

मुंबई : अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी पोलिसांनी बंगळुरू येथून ताब्यात घेतलेल्या ललित पाटील याची कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने न्यायालयात त्याला सादर करण्यात आले त्यावेळी न्यायालयाने आरोपी ललित पाटील याच्या कोठडीत २७ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली.

पुण्याच्या ससून रुग्णालयातून दोन आठवड्यापूर्वी पळून गेलेल्या ललित पाटील याला पोलिसांनी बंगळुरू येथून ताब्यात घेतले. त्याला सोमवारी अंधेरी न्यायालयात साकी नाका पोलिसांनी सादर केले. त्यावेळी पोलिसांच्या वतीने युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, ड्रग्सचे रॅकेट फार खोलवर पसरले आहे. ललित पाटील हा रुग्णालयातून रॅकेट चालवायचा त्यामुळे या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी त्याची कोठडीची शिक्षा वाढवण्यात यावी. आरोपी ललित पाटील याने आरोप फेटाळून लावले. न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य धरत ललित पाटील याच्या कोठडीत २७ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली.

टॅग्स :ललित पाटीलगुन्हेगारीन्यायालय