Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेस्को कॉन्सर्ट्सचा ‘ड्रग्ज पॅटर्न’, यापूर्वीही विद्यार्थ्यांनी घेतले होते ड्रग्ज; आराेपींच्या चाैकशीत आले समाेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 13:07 IST

Mumbai News: ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झालेल्या श्रेया राय या विद्यार्थिनीसह अन्य विद्यार्थ्यांनी यापूर्वीही नेस्कोच्या इन्व्हेन्टमध्ये एक्स्टॅसी (एमडीएमए) हे ड्रग्ज घेतल्याची माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आली.

मुंबई - ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झालेल्या श्रेया राय या विद्यार्थिनीसह अन्य विद्यार्थ्यांनी यापूर्वीही नेस्कोच्या इन्व्हेन्टमध्ये एक्स्टॅसी (एमडीएमए) हे ड्रग्ज घेतल्याची माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आली. त्यामुळे कार्यक्रम आयोजक व सुरक्षा व्यवस्थेतील काहींचा या रॅकेटशी संबंध असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

अटक आरोपी प्रतीक पांडे व श्रेया राय आणि अन्य मित्रांसोबत नेस्को येथे यापूर्वी झालेले म्युझिक टेक्नो प्रोग्रामसाठी आल्याचे तपासात समोर आले. तेव्हा त्यांनी एक्स्टॅसी (एमडीएमए) हे पार्टी ड्रग्जच्या गोळ्या घेतल्याचे सांगितले. त्यामुळे नेस्को येथे यापूर्वी झालेल्या कार्यक्रमामध्ये ड्रग्जचे वाटप झाल्याची शक्यता आहे. त्यानुसार आयोजकांच्या अधिक चौकशीसाठी पोलिसांनी आरोपींच्या न्यायालयात वाढीव कोठडीची मागणी केली. यामध्ये पांडेने नशेच्या गोळ्या खरेदी करून त्यांची कॉन्सर्टच्या ठिकाणी अन्य विद्यार्थ्यांना पुरवले. त्यांनी किती मित्रांना वाटप केले? त्याच्या बदल्यात किती पैसे मिळाले? याचा पोलिस तपास सुरू आहे. 

चॅटिंग परत मिळविण्याचा प्रयत्नअटक आरोपी पांडे व रौनक खंडेलवाल याने व्हॉट्सॲप ग्रुपमधील अमलीपदार्थ खरेदी करण्याची चॅटिंग, त्याबाबतचे आर्थिक व्यवहाराचे संदेश नष्ट केले. हे चॅटिंग परत मिळविण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे. 

नेस्कोचे सुरक्षा कर्मचारी रडारवर नेस्कोच्या कॉन्सर्टसाठी त्यांची स्वतःची सुरक्षा व्यवस्था आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेमधील कर्मचारी किंवा कार्यक्रमाचे आयोजकांच्या टीममधील सहकाऱ्यांचे ड्रग्ज पुरवठा करणाऱ्यांशी काही संबंध असल्याची दाट शक्यता पोलिसांनी न्यायालयात वर्तवली आहे. त्यानुसार चौकशी सुरू असल्याचेही नमूद केले. 

आयोजक संशयाच्या घेऱ्यात आयोजक विहान उर्फ आकाश समळ यांची  इन्स्पायरिंग टाय प्रोडक्शन कंपनीचा पत्ता नागपूरच्या संजय गांधी नगरचा आहे. आयोजकांच्या वरदहस्ताशिवाय झालेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अंमली पदार्थाचे वाटप होऊ शकत नाही, असा दावाही पोलिसांनी न्यायालयात केला आहे. त्यानुसार त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे सांगितले. तसेच आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचेही पोलिसांना सांगितले. 

विद्यार्थ्यांची मानसोपचार तज्ज्ञांकडे धावनेस्को ड्रग्ज प्रकरणात सहभागी झालेल्या काही विद्यार्थ्यांकडेही चौकशी होणार असल्याने काहींना पोलिसांचा ससेमिरा मागे लागणार असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे काहींनी मानसोपचार तज्ज्ञांकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे.कॉन्सर्टमध्ये झालेल्या ड्रग्सच्या वापराची चौकशी आपल्यापर्यंतही येण्याची अनेकांना भीती आहे. ऐन परीक्षांची वेळ; त्यात घरच्यांना काय उत्तरे द्यायची, अशा द्विधा मन:स्थितीत मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी  लागत आहे.

कॉन्सर्टमध्ये चोरांचीही लगबग नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये मोबाइल चोरांचीही लगबग दिसून आली. चार तरुणांसह दोन तरुणींनी पोलिसांत धाव घेतल्याने सहा महागडे मोबाइल चोरीला गेल्याचे उघडकीस आले. गर्दीचा फायदा घेत चोरांनी संधी साधल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nesco Concerts' Drug Pattern: Students Previously Used Drugs, Investigation Reveals

Web Summary : Nesco concerts face scrutiny after a student's drug overdose death. Investigation reveals prior drug use at events, implicating organizers and security. Police seek extended custody for accused, probing drug distribution and financial transactions. Security staff and organizers are under suspicion for potential involvement.
टॅग्स :गुन्हेगारीअमली पदार्थ