Join us

‘अपघात टाळण्यासाठी चालकांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 02:45 IST

अपघातामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष होणारे नुकसान हे राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या तीन टक्के असल्यामुळे ही समस्या गंभीर आहे.

मुंबई : अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन चालकांना रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यांना किमान आठ दिवसांचे प्रशिक्षण दिले पाहिजे, असे परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब म्हटले. सह्याद्री अतिथीगृह येथे गुरुवारी महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषदेची दहावी बैठक परिवहनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी सांगितले की, अपघातामुळे जीवित, वित्तहानी, वेळेचा अपव्यय होतो. कुटुंबासह अत्यावश्यक सेवा अडचणीत येते.

अपघातामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष होणारे नुकसान हे राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या तीन टक्के असल्यामुळे ही समस्या गंभीर आहे.वाहनचालकांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. ग्रामीण आणि शहरांमधील अपघातप्रवण क्षेत्रे ओळखून दीर्घ कालावधीसाठीच्या, तसेच तात्पुरत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, तसेच क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणारी वाहने, प्रवासी बसमधून विनापरवाना मालाची वाहतूक, बेकायदेशीर रिक्षा वाहतूक, दुचाकी रोड रेसिंगसारख्या बेकायदेशीर कृतींवर कारवाई करण्याच्या सूचना परिवहनमंत्र्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

टॅग्स :अनिल परबबसचालक