मुंबईत वाहनचालकांना पाठदुखी, कंबरदुखीने ग्रासले; रुग्णालयाचा खर्च अन् मानसिक तणावात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 16:21 IST2025-07-28T16:21:04+5:302025-07-28T16:21:30+5:30

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दरवर्षी पावसाळा सुरू होताच रस्त्यांची अवस्था बिकट होते.

Drivers in Mumbai suffer from back pain waist pain Hospital expenses and mental stress increase | मुंबईत वाहनचालकांना पाठदुखी, कंबरदुखीने ग्रासले; रुग्णालयाचा खर्च अन् मानसिक तणावात वाढ

मुंबईत वाहनचालकांना पाठदुखी, कंबरदुखीने ग्रासले; रुग्णालयाचा खर्च अन् मानसिक तणावात वाढ

मुंबई

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दरवर्षी पावसाळा सुरू होताच रस्त्यांची अवस्था बिकट होते. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूककोंडी तर होतेच, पण त्याहून अधिक गंभीर म्हणजे वाहनचालकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो. विशेषत: पाठदुखी, कंबरदुखी, स्लिप डिस्क यासारख्या विकारांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. 

पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे रस्त्यावरील डांबर उखडले जाते. त्यामुळे खड्डे तयार होतात. ते चुकवत दुचाकी, रिक्षा, टॅक्सी किंवा कार चालवताना सतत हादरे बसतात. अनेकदा खड्ड्यांच्या खोलीच्या अंदाज न आल्यास किंवा रात्री अंधारात खड्डा न दिसल्यास वाहन त्यात आदळते. त्यामुळे विशेषत: दुचाकी आणि रिक्षाचालकांना मणक्याचा त्रास सुरू होतो. तसेच स्लिप डिस्क, स्नायूंचा ताण, पाठदुखी, कंबरदुखी यासारख्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. 

दर्जेदार रस्ते बांधणी, तत्काळ डागडुजी आवश्यक
दर्जेदार रस्ते बांधणी, वेळेत देखभाल व दुरुस्ती, नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद आवश्यक आहे. स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करुन खड्ड्यांचा डेटा गोळा करणे आणि वाहनचालकाला सतर्क करणारी अॅप्स तयार करणे हे उपाय उपयुक्त ठरू शकतात. 

खड्ड्यांतून वाहन चालवताना मणक्यावर ताण येतो. त्यामुळे डिस्क सरकणे, स्पॉन्डिलोसिस व स्नायू दुखापती यांसारखे विकार वाढतात. काही रुग्णांना फिजिओथेरेपी घ्यावी लागते, तर काही वेळा शस्त्रक्रियाही आवश्यक ठरते. 
- डॉ. सिद्धार्थ कातकडे, स्पाइन सर्जन, बॉम्बे हॉस्पिटल

Web Title: Drivers in Mumbai suffer from back pain waist pain Hospital expenses and mental stress increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.