‘डॉ. पंजाबराव देशमुख यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 05:02 IST2019-07-18T05:02:12+5:302019-07-18T05:02:20+5:30

कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी प्रस्ताव राजशिष्टाचार विभागाकडे सादर करावा, असे निर्देश कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी बुधवारी कृषी विभागाला दिले.

'Dr. Punjabbarao Deshmukh to submit proposal for 'Bharat Ratna' | ‘डॉ. पंजाबराव देशमुख यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा’

‘डॉ. पंजाबराव देशमुख यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा’

मुंबई : कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी प्रस्ताव राजशिष्टाचार विभागाकडे सादर करावा, असे निर्देश कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी बुधवारी कृषी विभागाला दिले.
याबाबत बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. डॉ. पंजाबराव देशमुख व पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची कृषी विषयक कार्य आणि विचारांचा समावेश असलेली पुस्तिका तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश डॉ. बोंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत कृषी, राजशिष्टाचार विभाग आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: 'Dr. Punjabbarao Deshmukh to submit proposal for 'Bharat Ratna'