दाम्पत्याची आत्महत्या आर्थिक चणचणीतून

By Admin | Updated: May 7, 2016 00:52 IST2016-05-07T00:52:17+5:302016-05-07T00:52:17+5:30

बोरीवलीमध्ये गुरुवारी रात्री शाह या डॉक्टर दाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आर्थिक चणचणीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सुसाइड नोटमध्ये

Doubt suicide suicide | दाम्पत्याची आत्महत्या आर्थिक चणचणीतून

दाम्पत्याची आत्महत्या आर्थिक चणचणीतून

मुंबई : बोरीवलीमध्ये गुरुवारी रात्री शाह या डॉक्टर दाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आर्थिक चणचणीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिल्याचे पोलीससूत्रांचे म्हणणे आहे.
डॉक्टर अशोक शाह (५८) आणि त्यांची पत्नी इला (५४) यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर तयार झाला होता. ज्यामुळे ते दोघे तणावात होते, असे त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिल्याचे बोरीवली पोलिसांनी सांगितले. सध्या पोलीस शाह यांच्या शेजाऱ्यांचे तसेच नातेवाइकांचे जबाब नोंदवत आहेत. मात्र त्यांच्या दोन्ही मुलांना या प्रकारामुळे जबर धक्का बसला आहे.
दोन्ही मुले सध्या बोलण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. शेजाऱ्यांनी दिलेल्या जबाबात या दाम्पत्याची कधीही भांडणे होत नव्हती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते दोघे तणावात दिसत होते. मात्र त्यांच्यावर कोणते कर्ज होते, याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
बोरीवली येथील सोडावाला लेन परिसरात असलेल्या साईधाम इमारतीत शाह कुटुंबीय राहत होते. गुरुवारी रात्री त्यांनी राहत्या घरी गळफास घेत आयुष्य
संपविले. त्यानुसार बोरीवली पोलिसांकडून याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Doubt suicide suicide