दुहेरी योग; नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:16 IST2025-08-06T14:15:52+5:302025-08-06T14:16:20+5:30
यंदा पौर्णिमा ८ ऑगस्टला दुपारी २:१२ वाजता सुरू होऊन ९ ऑगस्टला दुपारी १:२१ वाजता संपणार आहे. त्यामुळे रक्षाबंधन सण यंदा ९ ऑगस्टला साजरा होणार आहे.

दुहेरी योग; नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन!
मुंबई : श्रावणातील शुक्ल पौर्णिमेला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. नारळी पौर्णिमेला कोळी बांधव तसेच समुद्रकिनारी राहणारे नागरिक समुद्राची पूजा करून मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. समुद्राला नारळ अर्पण करून बंद असलेल्या मासेमारी व्यवसायाला पुन्हा सुरुवात केली जाते. त्यामुळे कोळी बांधवांमध्ये नारळी पौर्णिमेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
यंदा पौर्णिमा ८ ऑगस्टला दुपारी २:१२ वाजता सुरू होऊन ९ ऑगस्टला दुपारी १:२१ वाजता संपणार आहे. त्यामुळे रक्षाबंधन सण यंदा ९ ऑगस्टला साजरा होणार आहे.
९५ वर्षांनंतर दुर्मीळ योग
रक्षाबंधनाला १९३० सालासारखाच दुर्मीळ महासंयोग तयार होत आहे. तेव्हा ९ ऑगस्टलाच राखी बंधनाचा सण साजरा झाला होता. पौर्णिमा तिथी दु. २:०७ वा. सुरू झाली.
यंदाच्या तिथीमध्ये फक्त पाच मिनिटांचा फरक आहे. ९५ वर्षांनंतर रक्षाबंधनाचा सण त्याच दिवशी, वेळेनुसार, नक्षत्र आणि योगानुसार साजरा केला जाणार आहे.
‘भद्रा’ काळात रक्षाबंधन नको
भद्रा काळ हा अशुभ असल्यामुळे या काळात भावाला राखी बांधू नये. ८ ऑगस्टला दुपारी २:१२ वाजता भद्रा काळ सुरू होऊन ९ ऑगस्टला उत्तर रात्री १:५२ वाजता संपत आहे. त्यामुळे यंदा रक्षाबंधनावर भद्राचे सावट नसेल.
तीन महत्त्वाचे योग
यंदा सौभाग्य योग, सर्वार्थ सिद्धी योग व रवी योग यांचा दुर्मीळ संयोग जुळून येत आहे. ९ ऑगस्टला सूर्योदयापासून दुपारी २:०५ वाजेपर्यंत हा योग असणार आहे. या काळात केलेले कार्य शुभ आणि फलदायी मानले जाते. त्यामुळे यंदाचे रक्षाबंधन खूपच खास आणि शुभ आहे.
२२ व्या स्थानातील श्रवण नक्षत्र मानले जाते शुभ
ज्योतिषशास्त्रात २२ व्या स्थानी असणारे श्रवण नक्षत्र शुभ मानले जाते. भगवान विष्णू हे याचे अधिष्ठाता असून, ग्रह स्वामी चंद्र आहे. या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांमध्ये चांगले ज्ञान, बुद्धिमत्ता, श्रवणशक्ती असते.
...या शुभ मुहूर्तावर बांधा राखी
रक्षाबंधनासाठी पहाटे ५:४७ ते दुपारी १:२४ हा शुभ मुहूर्त आहे.
सर्वार्थ सिद्धी योगाचा संयोग .