Join us  

कामगारांना वाऱ्यावर सोडू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे उद्योजकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 6:04 AM

भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आदी सहभागी झाले होते.

मुंबई : उद्योग व्यवसाय उभारणीत कामगारांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे सध्याच्या कठीण प्रसंगात उद्योगांनी कामगारांना वाºयावर सोडू नये. काही काळासाठी वेतन कपात केली तरी चालेल, पण कामगारांच्या नोक-या घालवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले. या प्रश्नावर आपण स्वत: काही व्यवस्थापनांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आदी सहभागी झाले होते. मुख्यमंत्री म्हणाले की, पुरेशा क्रयशक्तीच्या अभावी अद्याप बाजारपेठांत ग्राहक नसल्याने काहीशी अडचण आहे, परंतु परिस्थिती सुधारत जाईल. जिथे उद्योग सुरू झाले आहेत तिथे आपण व्यवस्थापन आणि कामगार यांच्या कोविड दक्षता समित्या स्थापन करू शकतो का, ते पाहिले पाहिजे. त्यामुळे आरोग्यदायी व सुरक्षित वातावरण तयार होईल. काही ठिकाणी नोकर कपात सुरू असल्याचे कळाले. मी यासंदर्भात काही व्यवस्थापनांशी बोलणार आहे. बैठकीला भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, अजित साळवी आदींनी सूचना केल्या.उद्योगमंत्री म्हणाले...कंपन्या आणि मालकांसमोरसुद्धा अडचणी आहेत; मात्र कामगार, कर्मचारी यांचे कुटुंब चालेल, चूल पेटेल अशी समंजस भूमिका घेणे गरजेचे असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले. देशातील पहिल्या औद्योगिक कामगार ब्युरोचे उद्घाटन आपण करीत आहोत. त्यामुळे कुशल, अकुशल आणि अर्धकुशल कामगारांना रोजगार मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्रव्यवसायशिवसेना