‘लतादीदींच्या प्रकृतीविषयी अफवांवर विश्वास ठेवू नका’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 05:26 AM2022-01-26T05:26:37+5:302022-01-26T05:27:43+5:30

डॉ. प्रतित समदानी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमकडून लतादीदीवर उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यास आम्ही माहिती देऊ, तुम्ही नकारात्मक अफवांना बळी पडू नका

'Don't believe the rumors about Lata's mangeshkar health' | ‘लतादीदींच्या प्रकृतीविषयी अफवांवर विश्वास ठेवू नका’

‘लतादीदींच्या प्रकृतीविषयी अफवांवर विश्वास ठेवू नका’

Next

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लतादीदींना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या १५-१६ दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या काळात त्यांच्या प्रकृतीविषयी अफवासुद्धा सोशल मीडियावर पसरत आहेत. मात्र या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि लतादीदींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा, अशी विनंती त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

डॉ. प्रतित समदानी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमकडून लतादीदीवर उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यास आम्ही माहिती देऊ, तुम्ही नकारात्मक अफवांना बळी पडू नका, असे आवाहन परिवाराने केले.

Web Title: 'Don't believe the rumors about Lata's mangeshkar health'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.