घरगुती पीएनजी, सीएनजी पुरवठ्यास आता प्राधान्य; केंद्राच्या निर्देशानंतर ‘एमजीएल’चा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:25 IST2026-03-16T13:24:55+5:302026-03-16T13:25:34+5:30

केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ९ मार्च  रोजी जारी केलेल्या गॅझेट अधिसूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला. 

Domestic PNG, CNG supply now a priority; MGL's decision after the Center's directive | घरगुती पीएनजी, सीएनजी पुरवठ्यास आता प्राधान्य; केंद्राच्या निर्देशानंतर ‘एमजीएल’चा निर्णय

घरगुती पीएनजी, सीएनजी पुरवठ्यास आता प्राधान्य; केंद्राच्या निर्देशानंतर ‘एमजीएल’चा निर्णय

मुंबई : शहरातील नैसर्गिक वायूची उपलब्धता लक्षात घेऊन महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल)ने घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) आणि सीएनजी पुरवठ्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ९ मार्च  रोजी जारी केलेल्या गॅझेट अधिसूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला. 

 घरगुती पीएनजी ग्राहक आणि सीएनजी पंपांना त्यांच्या मागील सरासरी वापराच्या आधारावर १०० टक्के गॅसपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी लागणारा गॅस तसेच सार्वजनिक वाहतुकीसाठी आवश्यक असलेली सीएनजीची उपलब्धता अबाधित राहणार आहे.  मात्र नव्या निर्देशांनुसार औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या गॅसपुरवठ्यात अंशिक कपात करण्यात येणार आहे. या ग्राहकांकडे पर्यायी ऊर्जास्रोतांचा वापर करण्याचा पर्याय असल्याने हा निर्णय घेतला आहे. 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला दिलासादायक
मर्यादित गॅस उपलब्धतेच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आदेशानुसार शहरातील घरगुती गरजा आणि परिवहन क्षेत्राची मागणी सर्वप्रथम पूर्ण केली जाईल. 
ऊर्जाक्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे उद्योगांच्या कार्यकारी खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र सामान्य ग्राहक आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला यामुळे दिलासा मिळणार आहे. गॅसपुरवठ्याचा समतोल राखण्यासाठी पुढील काळात परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

Web Title : केंद्र के निर्देश के बाद घरेलू पीएनजी, सीएनजी आपूर्ति को प्राथमिकता: एमजीएल का फैसला

Web Summary : केंद्र सरकार के निर्देश के बाद एमजीएल ने घरेलू पीएनजी और सीएनजी आपूर्ति को प्राथमिकता दी। आवासीय और सीएनजी पंपों को पिछले औसत के आधार पर 100% गैस आपूर्ति बनाए रखी जाएगी। औद्योगिक गैस आपूर्ति में आंशिक कटौती होगी, संतुलन के लिए निरंतर निगरानी की जाएगी।

Web Title : Home PNG, CNG Supply Prioritized After Central Directive: MGL Decision

Web Summary : MGL prioritizes home PNG and CNG supply following a central government directive. Residential and CNG pumps will maintain 100% gas supply based on past averages. Industrial gas supply will be partially cut, with continuous monitoring for balance.

टॅग्स :Governmentसरकार