प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप : वैद्यकीय सेवेवर फारसा परिणाम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 06:29 AM2018-06-14T06:29:23+5:302018-06-14T06:29:23+5:30

विद्यावेतन वाढवण्याच्या मागणीसाठी राज्यातील विविध रुग्णालयांतील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी मंगळवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून संप पुकारला आहे.

Doctor Strike : Medical services do not have much effect | प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप : वैद्यकीय सेवेवर फारसा परिणाम नाही

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप : वैद्यकीय सेवेवर फारसा परिणाम नाही

googlenewsNext

मुंबई : विद्यावेतन वाढवण्याच्या मागणीसाठी राज्यातील विविध रुग्णालयांतील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी मंगळवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून संप पुकारला आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे. राज्यभरातील २७०० तर मुंबईतील ६०० डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. मात्र, या संपाचा वैद्यकीय सेवेवर फारसा परिणाम झालेला नाही.
मुंबईतील केईएम, नायर, शीव व जे.जे. रुग्णालयातील ४००, तर नायर व सेंट जॉर्ज दंत महाविद्यालयातील २०० असे एकूण ६०० डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. मुंबईत निवासी डॉक्टरांची संख्या जास्त असल्याने या संपाचा फारसा फरक पडला नाही. मात्र, सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना ११ हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन देण्याचा निर्णय २०१५मध्ये घेण्यात आला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याने डॉक्टरांमध्ये सरकारबाबत तीव्र नाराजी आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची संघटना असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्सतर्फे २६ एप्रिल रोजी या मागण्यांसाठी मूक मोर्चा व निदर्शने केली होती. त्यानंतर २ मे रोजी वैद्यकीय शिक्षण संचालनालय व अर्थ मंत्रालयासोबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्यामध्ये वेतनवाढ देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही प्रत्यक्षात वेतनवाढीचा निर्णय झाला नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा संप करण्यात येत असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस डॉ. गोकुळ राख यांनी दिली. संपाला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा पाठिंबा मिळाला असून, मुंबईसह राज्यातील डॉक्टरांनी यात सहभाग घेतल्याचा दावा त्यांनी केला.

...म्हणून वेतनवाढ गरजेची
विद्यावेतनात वाढ करावी व ही वाढ फेब्रुवारी २०१८पासून लागू करावी, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. महाराष्ट्रातील इंटर्न्स डॉक्टरांना मिळणारे विद्यावेतन हे देशातील
सर्व राज्यांत सर्वांत कमी आहे. हे डॉक्टर आठवड्याला ५० ते ६० तास रुग्णसेवा करतात. त्यामुळे वेतनवाढ मिळावी, अशी
मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी केली आहे.

Web Title: Doctor Strike : Medical services do not have much effect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.