छत कोसळून सायन येथे डॉक्टर जखमी

By Admin | Updated: September 4, 2014 02:27 IST2014-09-04T02:27:34+5:302014-09-04T02:27:34+5:30

सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना राहण्यासाठी सायन भागातील 7 व्या गल्लीमध्ये बॅरेक देण्यात आली आहेत.

Doctor injured at the ceiling collapsed at Sion | छत कोसळून सायन येथे डॉक्टर जखमी

छत कोसळून सायन येथे डॉक्टर जखमी

मुंबई : सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना राहण्यासाठी सायन भागातील 7 व्या गल्लीमध्ये बॅरेक देण्यात आली आहेत. मंगळवारी पहाटे तीन वाजता एका खोलीच्या छतावर झाड पडल्याने त्या खोलीचे छत कोसळले. यामध्ये निवासी डॉक्टर ध्रुव शर्मा हे किरकोळ जखमी झाले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. 
सायन रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षण घेणारे डॉ. ध्रुव हे रेडिओलॉजी विभागात प्रथम वर्षात शिकत आहेत. डॉ. ध्रुव यांची खोली शेवटी आहे. याच खोलीच्या छतावर झाड पडल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत.  पहाटे कोसळलेल्या छताचा आवाज इतका मोठा झाला की बाजूच्या खोल्यांमध्ये असणा:या व्यक्तींना भूकंप होऊन काहीतरी पडले असेच वाटले होते. माङो मित्र धावत माङया खोलीमध्ये आले होते. त्यांनीच मला रुग्णालयात नेले. खोलीच्या दुस:या बाजूला 
असलेल्या खाटेवर छताचा मोठा 
भाग पडला होता. जिथे माझा 
रूममेट झोपतो, मात्र त्या दिवशी तो रूमवर नव्हता, असे डॉ. ध्रुव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Doctor injured at the ceiling collapsed at Sion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.