Join us  

"सरकार चालवताय की खाजगी सावकारी करताय?" महाविकास आघाडी सरकारला सवाल

By बाळकृष्ण परब | Published: November 23, 2020 4:31 PM

Ashish Shelar News : वीजबिलमाफीच्या मुद्यावरून आज राज्यात मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने जोरदार आंदोलन केले. राज्यातील विविध भागात भाजपाचे अनेक मोठे नेते या आंदोलनात सहभागी झाले होते.

मुंबई - वीजबिलमाफीच्या मुद्यावरून आज राज्यात मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने जोरदार आंदोलन केले. राज्यातील विविध भागात भाजपाचे अनेक मोठे नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, थकीत वीजबिलाच्या वसुलीवरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला जोरदार टोला लगावला आहे. अडचणीत असलेल्या जनतेला दिलासा तर नाहीच, उलट सावकारा सारखी वसूली कसली करताय? सरकार चालवताय की खाजगी सावकारी करताय? असा सवाल आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.आशिष शेलारांनी वीजबिलांच्या मुद्यावरून ट्विट करत महाविकास आघाडीवर टीका केली. त्यात ते म्हणाले की, अवाजवी आणि वाढीव वीजबिलं आकारून महाराष्ट्राच्या जनतेची लूट सरकार करू पाहतेय. सरकारच्या या "पठाणी" कारभाराची भाजपाने आज होळी पेटवली आहे! अडचणीत असलेल्या जनतेला दिलासा तर नाहीच, उलट सावकारा सारखी वसूली कसली करताय?सरकार चालवताय कि खाजगी सावकारी करताय?

दरम्यान, आज राज्यातील विविध भागात भाजपाकडून आंदोलन करण्यात आले. मुंबई भाजपचे प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत आज तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिसांनी आमदार भातखळकर यांच्यावर अटकेची कारवाई केली. अशाच प्रकराचे आंदोलन भाजपाकडून ठाण्यातही करण्यात आले.तर वाढीव विजबिलसंदर्भात एक रुपया कमी करणार नाही असे जाहिर करून राज्य शासनाबद्दलचा जनतेच्या मनातील विश्वास उडाला आहे. असे हे तीन तिघाडी काम बिघाडी आघाडी सरकार असून त्याचा भाजप कल्याण जिल्ह्यातर्फे जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे वक्तव्य पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केले. सोमवारी भाजपतर्फे कल्याणमध्ये आमदार गणपत गायकवाड, संजय मोरे यांच्या माध्यमातून महावितरणच्या तेजश्री, डोंबिवलीत मंडल ग्रामीण अध्यक्ष नंदू परब यांच्या मार्गदर्शनाखाली वीजबिल वाढीविरोधात एमयडीसीच्या महावितरण कार्यालयाबाहेर जनांदोलन करण्यात आले.

टॅग्स :आशीष शेलारमहाराष्ट्र विकास आघाडीशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस