बोली प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जेटच्या स्लॉटचे हस्तांतर नको; कर्मचाऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 05:56 AM2019-04-23T05:56:45+5:302019-04-23T05:56:56+5:30

अद्याप मालकी हक्क एअरवेजचाच असल्याकडे वेधले लक्ष

Do not transfer the jet slot until the bidding process is completed; Employees' demand | बोली प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जेटच्या स्लॉटचे हस्तांतर नको; कर्मचाऱ्यांची मागणी

बोली प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जेटच्या स्लॉटचे हस्तांतर नको; कर्मचाऱ्यांची मागणी

Next

मुंबई : जेट एअरवेजची बोली प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जेटच्या विविध विमानतळांवरील स्लॉटचे हस्तांतरण दुसºया विमान कंपन्यांना करण्यात येऊ नये, अशी मागणी आॅल इंडिया जेट एअरवेज टेक्निकल असोसिएशनने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) केली आहे. जेटच्या ताब्यातील स्लॉट विमान कंपन्यांना हस्तांतरित केल्यास त्याचा जेटच्या बोली प्रक्रियेवर विपरीत परिणाम होण्याची भीती असोसिएशनने वर्तवली आहे.

‘जेट’ची सेवा बंद झाल्याने देशातील हवाई वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसला. अचानक विमानांच्या फेºया व आसने कमी झाल्याने तिकीट दरात मोठी वाढ झाली. त्यामुळे डीजीसीएने जेटच्या वापरातील स्लॉट इतर कंपन्यांना हस्तांतर करण्यास प्रारंभ केला. याचा जेटच्या बोली प्रक्रियेवर वाईट परिणाम होईल, असे सांगत असोसिएशनने त्याला विरोध केला. मुंबई व दिल्लीत वापराविना असलेल्या सुमारे ४४० स्लॉटचा वापर करून प्रवाशांना दिलासा देण्याचे डीजीसीएचे धोरण आहे. मात्र, जेट पूर्ण बंद होईपर्यंत या स्लॉट्सची मालकी जेट एअरवेजची असल्याकडे असोसिएशनने लक्ष वेधले आहे.

तिकीट परताव्याबाबत आयएटीएसोबत चर्चा
इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए)ने जेट एअरवेजची तिकीट प्रणाली स्थगित करण्यात आली. जेट एअरवेजकडून तिकीट परताव्याची रक्कम नेमकी कधी मिळणार, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती.
मात्र, याबाबत प्रवाशांना दिलासा देत जेट एअरवेजने बिलिंग अ‍ॅण्ड सेटलमेंट प्लॅन (बीएसपी)मधील रकमेतून परतावा देण्याबाबत आयएटीएसोबत चर्चा केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Do not transfer the jet slot until the bidding process is completed; Employees' demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.