Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांकडे विनाकारण गर्दी करू नका; गेलातच तर ही पथ्यं नक्की पाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 17:13 IST

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी झटणाऱ्या डॉक्टरांना सहकार्य करा, : विभागीय आयुक्तांचे आवाहन

जमीर काझी

मुंंबई : कोरोनाच्या विषाणूच्या पादुर्भावाला रोखण्यासाठी डाँक्टर अहोरात्र झटत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे, उगाच छोटयाछोट्या गोष्टी साठी जाऊ नका,खूपच त्रास होतं असेल तरच जा, असे आवाहन मुंबईचे विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी केले आहे.

प्रशासनाच्या सर्व सूचनांंचे पालन करताना डॉकटराना विनाकारण  गर्दी करू नका ,त्यांंच्यावर निष्कारण कामाचे ओझे टाकू, नका, असे त्यांनी 'लोकमत ऑनलाईन' शी बोलताना सांगितले. कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून युद्धस्तरावर  प्रयत्न सुरू आहेत, नागरिकांनी जमावबंदीच्या आदेशाचे १०० टक्के पालन करा,त्यामुळेच आपण या दृष्टचक्रातून लवकर बाहेर पडू, त्याचबरोबर नागरिकांनी सद्याच्या परिस्थितीत किरकोळ कारणांसाठी दवाखान्यात गर्दी करू नये, उदाहरणार्थ दाढ दुखते, पोटात दुखते, पोटात चावते, इत्यादी. तसेच डॉक्टरकडे जाताना रुग्ण सोबत एकटे जा, त्यांच्यापासून एक मीटर अंतर राखून बोला, डॉक्टर ना कळते कोणत्या रुग्णाला स्पर्श करून तपासावे लागते व कोणत्या रुग्णाला नाही,  त्यांना आपली खरी हिस्ट्री सांगा,  कोठून आलात, दहा बारा दिवसा पूर्वी कोठे कोठे गेला होता. सर्वात महत्वाचं दवाखान्यात जाताना हात साबण किंवा स्वच्छ धुवा, डॉक्टरांशी बोलताना रुमाल किंवा मास्क बांधा,  कोणत्याही वस्तूला विनाकारण स्पर्श करू नका, दवाखान्यातुन बाहेर पडताना पून्हा हात साबण किंवा सॅनिटायझरने धुवा डॉक्टर ना पैसे देताना शक्यतो ऑनलाइन पेमेंट करा, नोटा मोजताना आपल्याला थुंकी लावून मोजायची सवय असतें ती टाळा.,असेही दौंड यांनी सांगितले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस