‘दीपज्योतीनमोस्तुते’च्या सुरांत रंगणार दिवाळी सांज

By admin | Published: October 27, 2016 04:21 AM2016-10-27T04:21:33+5:302016-10-27T04:21:33+5:30

मंगलमय वातावरणात सुमधुर स्वरांनी दिवाळीचे स्वागत करण्यासाठी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे, ‘दीपज्योतीनमोस्तुते’ या कार्यक्रमाचे आयोजन

Diwali Sanjay will play Deepajyotin Mastusta's Surat | ‘दीपज्योतीनमोस्तुते’च्या सुरांत रंगणार दिवाळी सांज

‘दीपज्योतीनमोस्तुते’च्या सुरांत रंगणार दिवाळी सांज

Next

मुंबई : मंगलमय वातावरणात सुमधुर स्वरांनी दिवाळीचे स्वागत करण्यासाठी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे, ‘दीपज्योतीनमोस्तुते’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आप्तेष्टांच्या भेटीबरोबरच दीवाळीच्या सांजवेळी रसिकांना एक वेगळा अनुभव ‘दीपोत्सव व पुरस्कार सोहळा’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेता येणार आहे. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.
हा कार्यक्रम शनिवार, २९ आॅक्टोबर रोजी सायं ७ ते १० या वेळेत प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे. दिवाळी सांज अधिकच मंगलमय करण्यासाठी मराठी क्षेत्रातील दिग्गज कलाकारांची मांदियाळी उपस्थित राहणार आहे. पुष्कर श्रोत्री, सुदेश भोसले, पूर्वा भावे, दीपाली सय्यद, मंगेश बोरगावकर, भार्गवी चिरमुले, अजित परब, विजय कदम, पुष्कर जोग, पद्मश्री कदम, केतकी पालव, नंदेश उमप असे कलाकार विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाला सुरमयी संगीताची झालरही आहे. विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन या यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. सध्या गाजत असलेला ‘लोकमत’चा ‘दीपोत्सव’ हा दिवाळी अंक यावेळी रसिकांना सवलतीच्या दरात उपलब्ध होईल.

Web Title: Diwali Sanjay will play Deepajyotin Mastusta's Surat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.