Join us  

कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही; उद्धव ठाकरे यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 12:54 AM

स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे, हे आपले प्राधान्य असले पाहिजे.

मुंबई : दिवाळीचा आनंद घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. स्वत: देखील केवळ सोशल मीडिया, ई मेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून घरच्याघरी हा सण साजरा करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात की, कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही. लस जेव्हा येईल आणि आपल्यापर्यंत पोहचेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे, हे आपले प्राधान्य असले पाहिजे. हजारो डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस हे सणवार विसरून कोरोनाशी लढताहेत, सर्वांचा जीव कसा सुरक्षित ठेवायचा ते पाहताहेत. हे कृपया विसरू नका, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरे